लॉकडाउन मध्ये नोकरी गमावलेल्या ‘विशाल’ ला आम आदमी पार्टी चा साथ

38

🔸आप च्या ‘मागेल त्याला उद्योग’ अभियानांतर्गत उभे केले दुकान

✒️चिमूर (पुरोगामी संदेश नेटवर्क)

चिमूर(दि.12नोव्हेंबर):-कोरोनामुळे लागू झालेल्या संचारबंदीत अनेक उद्योग ठप्प झालेत, अचानक आलेल्या आर्थिक संकटामुळे अनेक होतकरू तरुण-तरुणींना नोकरी गमवावी लागली. अचानक आलेल्या या संकटामुळे अनेकांची आर्थिक घडी विस्कटल्या गेली. चिमूर विधानसभेतील अनेक युवक-युवती पुणे, मुंबई सारख्या शहरात लहान-मोठी नोकरी करीत होते परंतू संचारबंदी मुळे त्यांना आप-आपल्या गावी यावे लागले.

हाताला काम नाही, नोकरी नाही आणी ग्रामीण भागात उदरनिर्वाहासाठी काय करणार हा मोठा प्रश्न होता. चिमूर विधानसभेत आम आदमी पार्टी तर्फे प्रा. डॉ. अजय घनश्यामजी पिसे यांच्या नेतृत्वात होतकरू युवक युवतींच्या मदतीसाठी ‘मागेल त्याला उद्योग’ हे अभियान राबविण्यात येत आहे. नेरी येथिल विशाल बारस्कर हा युवक अनेक वर्षांपासून पुणे येथे एका खासगी कंपनी मध्ये काम करत असतांना कोरोना काळातील संचारबंदीमुळे कंपनी बंद झाल्याने नोकरी गमवावी लागली.

लॉकडाऊन मध्ये पुणे वरून आपल्या गावाला यावे लागले. नोकरी नाही व हाताला कोणतेही काम नाही म्हणून हतबल झालेल्या ‘विशाल’ ला आम आदमी पार्टी च्या ‘मागेल त्याला उद्योग’ अभियानाची साथ मिळाली याअंतर्गत विशाल ला नवीन उद्योगासाठी मार्गदर्शन व मदत करण्यात आली यातूनच आज विशाल चे छोटेसे दुकान उभे राहले आहे.

चिमूर विधानभेत आम आदमी पार्टी च्या ‘मागेल त्याला उद्योग’ अभियानाला युवक-युवतींचा चांगला प्रतिसाद लाभत असून अनेकांनी आपले लहान मोठे उद्योग उभारणे चालू केले आहे. या अभियानाला यशस्वी करण्याकरिता आप चे आदित्य पिसे, विशाल इंदोरकर, मंगेश शेंडे, सुशांत इंदोरकर, समिधा भैसारे, विलास दिघोरे, कैलास भोयर, त्रिलोक बघमारे, यशवंत सरदार, मंगेश वांढरे, निरंजन बोरकर, शिवाजी बोरकर व इतर अनेक स्वयंसेवक परिश्रम घेत आहेत.