सौ.शालू विनोद कृपाले यांची साहित्य क्षेत्रात गोंदिया जिल्हाध्यक्ष पदी नेमणूक

54

✒️अंगद दराडे(विशेष प्रतिनिधी)मो:-8668682620

गोंदिया(दि.12नोव्हेंबर):-अखिल भारतीय मराठी साहित्य मंडळ मुंबई या साहित्य संस्थेची नुकतिच कार्यकारनी करण्यात आली असून या कार्यकारनी मध्ये अखिल भारतीय मराठी साहित्य मंडळ मुंबई च्या वतीने गोंदिया जिल्हाच्या जिल्हाध्यक्ष पदी कवियत्री सौ. शालू विनोद कृपाले यांची निवड करण्यात आली आहे .ही निवड झाल्याने जिल्ह्यात त्यांचं कौतुक केलं जातं आहे सौ .शालू विनोद कृपाले (मोहतेज) या नावाने लिखाण करतात.

चंद्रपूर जिल्हाध्यक्ष ज्येष्ठ कवी मा. वसंतराव ताकधट यांच्या शिफारशी नुसार ,तसेच संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. जयप्रकाश घुमटकर यांच्या आदेशानुसार “मोहतेज,यांना संस्थेने पाच वर्षा करिता निवड करण्यात आली आहे.मराठी भाषेची अस्मिता जपन्यासाठी तसेच आपल्या बोलिला वाव मिळावा म्हणून आणि त्यांच उत्क्रूष्ठ सामाजिककार्य बघून त्यांच्या कार्याची पावती म्हणून पुढील कार्याच्या वाटचालिसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. शालू कृपाले (मोहतेज,)या टोपन नावाने ओळखले जातात व काव्यलेखन करतात.

यांच्या अध्यक्षपदाच्या लाभलेल्या यशासाठी “मराठी साहित्य सखी मंच” तसेच त्यांचे बंधू कवी नंदकुमार मुकुंदाजी शेंद्रे (नंदकवी), काव्यरत्न रावसाहेब राशिनकर,(राज्यस्तरीय कुसुमाग्रज गौरव पुरस्कार सन्मानित) तसेच कविवर्य, संपादक अंगद दराडे यांचा मोलाचा हातभार लागलेला आहे, कवयित्री सौ. शालू कृपाले यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले.

राष्ट्रवादी चित्रपट साहित्य कला व सांस्कृतिक विभागाचे गोंदिया जिल्हाध्यक्ष तसेच नक्षत्राचं देणं काव्यमंच गोंदिया जिल्हाध्यक्ष रुतूकवी,नाट्यकलावंत ,चंदू पाथोडे (पाटील ) यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.