घनासावंगी तालुक्यात उसाच्या गलिच्छ राजकारणामुळे शेतकऱ्यांची दयनीय अवस्था

38

🔹शिवसेना नेते डॉ.हिकमत उढाण यांची आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचे नांव न घेता टिका

✒️अतुल उनवणे(जालना,जिल्हा प्रतिनिधी)मो:-9881292081

घनसावंगी(दि.12नोव्हेंबर):-मतदारसंघात गेल्या वीस ते पंचवीस वर्षांपासून उसाचे अत्यंत गलिच्छ राजकारण करण्यात येत असून त्या माध्यमातून गुऱ्हाळासाठी जसा उसाचा रस काढण्यात येतो तशी पिळवणूक शेतकऱ्यांची आतापर्यंत होतआल्याची खरमरीत टीका शिवसेनेचे नेते
जिल्हा सहसंपर्क प्रमुख डॉ. हिकमत उढाण यांनी समर्थ-सागर सहकारी साखर कारखान्याचे सर्वेसर्वा तथा पालकमंत्री राजेश टोपे यांचे नाव न घेता केली आहे. डॉ.उढाण यांच्या हस्ते सोमवारी जोगलादेवी येथील आनंद-मोहन व जोगेश्वरी गुळ उद्योगाचा शुभारंभ करण्यात आला.

त्याप्रसंगी ते बोलत होते. घनसावंगी तालुक्याची भौगोलिक
रचना पाहिली तर संपूर्ण तालुका गोदावरीच्या काठावर बसलेला आहे.पाणी भरपूर असल्याने या भागात शाश्वत पीक देणारे ऊस हे एकच पीक आहे.त्यामुळे बहुतांश शेतकरी उसाचे पीक घेतो.पूर्वी कारखाने नसल्याने  गुऱ्हाळे सुरू होती. काळानुरूप परिस्थिती बदलत जाऊन गुऱ्हाळाचा व्यवसाय हळूहळू कमी झाले. आता ऊसाचे पीक घेऊन कारखाना आपला ऊस कधी नेईल यासाठी शेतकरी कारखान्याकडे डोळे लावून बसलेला असतो.

परंतु घनसावंगी मतदान संघात निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन व प्रत्येक निवडणुकीच्या वेळी उसाचे राजकारण केले जाते.उसाचे राजकारण करून निवडणुकांत कोणी आपले काम केले, कोण कुटं गेले , कोण कोणासोबत फिरलं, आपला कोण , परका कोण हे सर्व पाहून शेतकऱ्यांचा उस नेण्यासाठी अत्यंत गलिच्छ राजकारण करण्यात येते अशी टिका डॉ.उढाण यांनी केली.तसेच डॉ.उढाण यांनी अशीही टिका केली की, उस राजकारण करून बऱ्याच शेतकऱ्यांचा उस तालुक्यातील संबंधित कारखान्याने नेला नसल्याने उस तोडून बांधावर टाकण्याची वेळ येते असं म्हटलं.

मतदार संघात शेतकऱ्यांच्या द्रुष्टीने ही अत्यंत वाईट अवस्था असल्याचे डॉ.उढाण यांनी म्हटलं.तालुक्यातील या उसाच्या गलिच्छ राजकारणाचा विचार करून शेतकऱ्यांनी एकत्र येत किंवा आपआपल्या परीने छोटे मोठे उसावर प्रक्रिया करणारे उद्योग व गुऱ्हाळाच्या माध्यमातून गूळ निर्मिती प्रकल्प चालु केले पाहिजेत असं डॉ उढाण यांनी सांगितलं.कार्यक्रमाला परिसरातील उसउत्पादक शेतकऱ्यांची उपस्थिती होती.