नांदूर मधमेश्वर पक्षी अभयारण्य

    44

    तुम्हाला पक्ष्यांची शाळा बघायची, किलबिलाट  ऐकायचा ,पक्ष्यांच्या विविध कसरती बघायच्या तेच ते ठिकाणे फिरून कंटाळा आला असेल  तर महाराष्ट्राचे भरतपूर अशी ज्याची ख्याती आहे ते म्हणजे नांदूर मधमेश्वर पक्षी अभयारण्य. भरतपुर पक्षी अभयारण्य राजस्थान मध्ये असून अनेक पक्षी आपणास त्या ठिकाणी बघायला मिळतात पण महाराष्ट्रातील लोकांना  भरतपुर  मध्ये जाण्याची गरज नाही महाराष्ट्राचे भरतपूर असं थोर पक्षी तज्ञ डॉक्टर सलीम अली यांनीच नांदूर मधमेश्वरचे वर्णन केले आहे.

    नाशिक पासून ते चाळीस ते पन्नास किलोमीटर अंतरावर सिन्नर पासुन 25 किलोमीटर अंतरावर तर निफाड रेल्वे स्टेशन पासून 15 किलोमीटर अंतरावर  गोदावरी व कादवा नद्यांच्या संगमाच्या ठिकाणी खानगावथडी या ठिकाणी हे पक्षी अभयारण्य आहे  गंगापूर व दारणा धरणातून आलेले पाणी याठिकाणी अडवले व त्याचा जो फुगवटा निर्माण झाला त्यामध्ये  अनेक छोटी छोटी पण समृद्ध बेटे तयार झाली, दलदल तयार झाली .दलदलीचा प्रदेशात  अनेक प्रकारच्या वनस्पती ,गवत आढळते त्यामुळे पक्ष्यांसाठी उत्तम निवारा आपोआप तयार झाला आहे पाण्यातली जैवविविधता ,उत्तम अन्नसाखळी येथे आढळते कारण या जलाशयात जवळजवळ 24 प्रकारचे मासे , साठ प्रकारच्या पाणवनस्पती 250 पेक्षा जास्त पक्ष्यांच्या जाती व त्यात 80 पेक्षा जास्त स्थलांतरित पक्षी आढळतात एकाच ठिकाणी आढळणारे महाराष्ट्रातले हे एकमेव ठिकाण आहे.

    पक्ष्यांसाठी मोठ्या प्रमाणामध्ये शैवाल ,मासे किटक व अन्य जलचर येथे उपलब्ध आहे .जसे अनेक चाकरमानी गणपती उत्सवाला, दिवाळीला आपापल्या घरी जातात त्याचप्रमाणे हिवाळा सुरू झाला की  ईकडे  अनेक पक्षी स्थंलातर करतात.अनेक पक्षांची मांदियाळी या परिसरात दिसते. हजारो किलोमीटरचा प्रवास करून युरोप ,सैबेरिया व जगभरातून अनेक  पक्षी येतात हेच पक्षी या अभयारण्याचे मुख्य आकर्षण आहेत .हिवाळ्यामधले हवामान या पक्षांना मानवते शिवाय या ठिकाणी  खाद्य मोठ्या प्रमाणामध्ये उपलब्ध असल्यामुळे अनेक जातीचे पक्षी आपणास बघावयास मिळतात पक्षी निरिक्षणासाठी वीस रुपयाचे नाममात्र शुल्क आकारले जाते.

    पक्षी निरीक्षणासाठी उत्तम संधी  वन विभागाने उपलब्ध करून दिली आहे गेटवरच आपणास लोकल  गाईड ही मिळतो गरज असेल तर पन्नास रुपयात  दुर्बीण आपल्याला  भाड्याने घेता येते अन दुर्बिणीशिवाय पक्षी निरीक्षण करणे अशक्य आहे कारण विस्तीर्ण जलाशय आहेत आणि त्यामुळे पक्षी साध्या डोळ्यांनी अगदी छोटे छोटे  दिसतात त्यांची हालचाल टिपता येत नाही .एखादी वही, पेन पेन्सिल असल्यास आपणास पक्ष्यांच्या नोंदी घेता येतात स्थलांतरित पक्षी व स्थानिक पक्षांची माहिती वन विभागाने रस्त्याच्या कडेला लावली आहे.

    त्यामुळे आपणास त्याची माहिती मिळते पक्षी निरीक्षणासाठी वन विभागाने अनेक ठिकाणी मचान बांधलेले  आहेत पण आपण जर पावसाळ्यात गेला तर आपणास त्या मचाणावर सहजासहजी जाता येणार नाही. पक्षी निरीक्षणासाठी उत्तम कालावधी हा हिवाळा  आहे या भागात लांडगे कोल्हे मुंगूस साप सरडे हे आढळतात म्हणून आपण आपली काळजी घेतलेली बरी पक्षीसंपदा : अभयारण्यात टिल्स् , पोचार्ड , विजन , गडवाल , शॉवलर , पिनटेल , क्रेन , गारगनी , टर्नस् , गुज़ , पेलिकन , गॉडविट , सँण्ड पायपर , क्रेक , श्यांक , कर्म्यु , हॅरियर , पॅटिनकोल , गल , इत्यादी स्थलांतरित पाणपक्षी आढळतात . त्याचप्रमाणे पाणकोंबडी , मुग्ध बलाक , गायबगळे , मध्यम बगळे , खंड्या , आयबीस , स्टॉर्क , इत्यादी स्थानिक पक्षी दिसून येतात . जलाशयालगत गवतीमाळ व वृक्षराईत अनेक जातीचे लहान – मोठे स्थानिक व स्थलांतरित पक्ष्यांचा अधिवासही आहे . याशिवाय पाणकावळे , पाणडुबी , रोहित , चमचा , धूनवर कुट आदि स्थानिक स्थलांतरित पक्षीही आढळतात नांदूर मधमेश्वर अभयारण्य 1986 मध्ये  अधिसूचित करण्यात आले आहे.

    अभयारण्याचे एकूण क्षेत्रफळ शंभर चौरस किमीचा असून हे क्षेत्र सरकारने भारतीय पक्षीतीर्थ जाळे म्हणून विकसित केले आहे महाराष्ट्रात  असूनही महाराष्ट्रातील लोकांना माहित नसलेले ठिकाण  हौशी पक्षी निरीक्षणासाठी, पर्यटनासाठी नक्कीच उत्तम ठिकाण ठरेल पक्षांना शांतता लागते ,त्यामुळे येथे जाऊन आरडाओरडा गोंधळ मोठमोठ्यानं बोलणे हे टाळून शांतपणे पक्षीनिरिक्षणाचा आनंद आपणास लुटता येईल.पक्षी निरीक्षकांसाठी उपलब्ध सुविधा  पर्यटकांना पक्षी निरीक्षण व माहिती देण्यासाठी मार्गदर्शक आहेत .अभयारण्यात पक्षी निरीक्षणासाठी दुर्बिणी , स्पॉटींगस्कोप उपलब्ध आहेत.

    पर्यटकांना चापडगाव येथे निरीक्षण गॅलरी , निरीक्षण मनोरे , वनउद्यान , पार्किग , प्रसाधनगृह , इकोहट व मांजरगाव येथे निरीक्षण मनोरे इत्यादी सुविधा उपलब्ध केल्या आहेत .वनविभागाच्या खाणगावथडी येथे निसर्ग निर्वाचन केंद्र , वनउद्यान , वनविश्रामगृह , डॉरमेट्री , पार्किंग इत्यादी सुविधा उपलब्ध आहेत.वनविश्रामगृह व्यतिरिक्त अभयारण्य क्षेत्रालगत खाणगाव थडी येथे सिंचन विभागाचे विश्रामगृह आहे .आरक्षणासाठी कार्यकारी अभियंता , सिंचन विभाग , उंटवाडी रोड , नाशिक येथून आरक्षण उपलब्ध होऊ शकते .याशिवाय नाशिक , निफाड व सिन्नर येथे अन्य निवासव्यवस्थाही होऊ शकते. वरील सुविधा समितीमार्फत नाममात्र दरात उपलब्ध असल्याने त्यांचा लाभ घ्यावा.

    ✒️लेखक:-राहिंज अशोक(विद्या विकास मंदिर ,राजुरी ता.जुन्नर,जि.पुणे)मो:-7588625406

    ▪️संकलन(माधव शिंदे,नांदेड,जिल्हा प्रतिनिधी)मो:-7757073260