अतिवृष्टीच्या अनुदान यादीत नावे पाहण्यासाठी शेतकऱ्यांची गर्दी

    42

    ?कुंडलवाडी नगरपरिषदेत लावण्यात आली यादी

    ✒️अशोक हाके(बिलोली,तालुका प्रतिनिधी)मो:-9970631332

    कुंडलवाडी(दि.13नोव्हेंबर):-यंदा अतिवृष्टीमुळे शहर व परिसरात मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान झाले.दरम्यान शासनाकडून अतिवृष्टीचे अनुदान जाहीर झाले.कुंडलवाडी सज्जा अंतर्गत असलेली यादी नगरपरिषदेच्या सुचना फलकावर लावण्यात आली आहेत.यादीत नावे पाहण्यासाठी शेतकऱ्यांची गर्दी होत आहे.

    कुंडलवाडी शहर व परिसरात यंदा सततचा पाऊस,अतिवृष्टीमुळे खरीप पिकांना मोठा फटका बसला आहे.शेतांना तलावाचे स्वरूप प्राप्त झाले आहे.त्यातच शेतातील पिके होत्याची नव्हती झाली.शेतजमीनी खरडून निघाल्या.दरम्यान राज्य शासनाकडुन अतिवृष्टीग्रस्त भागासाठी दोन हेक्टरी मदत जाहीर केली.जिरायत पिकांसाठी हेक्टरी दहा हजार रूपये तर फळबागांसाठी हेक्टरी पंचवीस हजार रूपये मदत देण्यात येणार असल्याने दि.९ नोव्हेंबर रोजी कुंडलवाडी तलाठी सज्जा कार्यालयाकडून नगरपरिषदेच्या सुचनाफलकावर याद्या लावण्यात आल्या आहेत.

    ज्या शेतकऱ्यांचे खातेक्रमांक नसेल त्यांनी तलाठी कार्यालयात जमा करावे,अशा सुचना देण्यात आले आहेत.बहुतांश शेतकऱ्यांचे खाते क्रमांक, आधार क्रमांक हे मागील काही वर्षापासून देण्यात येत असलेल्या अनुदानामुळे तलाठी कार्यालयात उपलब्ध आहे.मात्र काही शेतकऱ्यांचे खाते क्रमांक चुकीचे आहेत.तर काहींच्या नावे शेती केल्याने त्यांचे खातेक्रमांक देणे आवश्यक आहे.

    अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.शासनाकडून मिळणारी रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात दिली जाणार आहे.शेतकऱ्यांनी खातेक्रमांक, आधारक्रमांक ,क्षेत्र लावलेल्या यादीमध्ये पाहून घ्यावेत.अतिवृष्टी अनुदानापासुन कुठलाही शेतकरी वंचित राहू नये.यासाठी याद्या नगरपरिषदेच्या सुचना फलकावर लावण्यात आले आहेत.काही त्रुटी व दुरुस्ती असल्यास तात्काळ तलाठी कार्यालयात कागदपत्रे जमा करावीत असे आवाहन मंडळाधिकारी रोहीदास मेहत्रे व तलाठी बी.एन. बिरादार यांनी केले आहे.