पोलीस व आर्मी भरतीपूर्व प्रशिक्षणासाठी ग्रामीण भागात आंतरराष्ट्रीय दर्जाचे प्रशिक्षण उपलब्ध करून देणार – प्रा. डॉ. अजय घनश्यामजी पिसे

31

🔹होतकरू युवक-युवतींसाठी नेरी येथे छत्रपती पोलीस व आर्मी भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्रात प्रवेश प्रकिया सुरु

✒️चिमुर(पुरोगामी संदेश नेटवर्क)

चिमूर(दि.14नोव्हेंबर):- विधानसभेतील होतकरू युवक-युवतींना पोलीस व आर्मी मध्ये चांगले करिअर करण्याच्या संधी मिळाव्या या उद्देशाने नेरी येथे प्रा. डॉ. अजय घनश्यामजी पिसे यांच्या मार्गदर्शनात “छत्रपती पोलीस व आर्मी भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्रा”ची स्थापना करण्यात आलेली आहे. ग्रामीण भागातील युवक-युवती हे प्रतिभाशाली व मेहनती असूनही परिस्थितीमुळे व योग्य मार्गदर्शना अभावी चांगले करिअर घडवू शकत नाही, यामुळे या होतकरू मुला-मुलीनां हतबल राहावे लागते, योग्य असे काम मिळत नसल्यामुळे युवक-युवतींमध्ये निराशेचे प्रमाण वाढतच आहे.

ग्रामीण भागातील युवक-युवती हे शरीर यष्टीने काटक तसेच प्रतिभावंत असल्यामुळे पोलीस, आर्मी व वनविभागामध्ये अतिशय चांगल्या प्रकारे सेवा देवू शकतात. हि संधी ओळखून प्रा. डॉ. अजय पिसे यांच्या मार्गदर्शनातून छत्रपती पोलीस व आर्मी भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्राची संकल्पना उभी राहली. कुंग-फु, कराटे, व मार्शल आर्ट मध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर नावाजलेल्या व सात डिग्री ब्ल्याक बेल्ट धारण करून ‘शिफू’ या पदवीने सन्मानित असलेल्या सुशांत इंदोरकर यांची ‘छत्रपती पोलीस व आर्मी भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्रा’च्या संचालक पदी नियुक्ती करण्यात आली आहे.

छत्रपती पोलीस व आर्मी भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्रात तीन महिन्यांच्या प्रशिक्षण वर्गात युवक-युवतींना आंतरराष्ट्रीय दर्जाचे प्रशिक्षण उपलब्ध करून देण्यात येईल तसेच निवृत्त पोलीस व आर्मी अधिकाऱ्यांकडून मार्गदर्शन देण्यात येणार आहे. दररोज लेखी व शारीरिक परीक्षा घेवून तयारी साठी अव्वल बनविण्याचा आमचा प्रयत्न असेल असे संचालक मंडळाकडून पत्रकार परिषदेत सांगण्यात आले.