राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना भारतरत्न द्या

31

🔹श्री.गुरुदेव सेवा सहयोग समिती आत्मनुसंधान भु-वैकुंठ अड्याळ टेकळी यांनी केली मागणी

✒️रोशन मदनकर(उप संपादक)मो:-8888628986

ब्रह्मपुरी(दि.14नोव्हेंबर):- मानवतेचे महान पुजारी वं. राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांनी या राष्ट्रासाठी बहुमोल योगदान दिले आहे त्यांनी गल्ली पासून ते दिल्ली पर्यंत आपल्या भजनाच्या व साहित्याच्या माध्यमातून राष्ट्रात पडलेल्या तुकड्याला तुकडे जोडून भारताला अखंडित ठेवण्यासाठी आपले संपूर्ण जीवन जनता जनार्दन व देश्याच्या सेवेमध्ये चंदना सारखे झिजविले आहे. तसेच स्वातंत्र्याच्या चळवळी मध्ये राष्ट्रसंतांनी आपली भूमिका प्रमुखपणे बजावत येथील इंग्रजांना गर्भित इशारा दिला.

आपल्या भजनाच्या माध्यमातून तरुणांना जागृत करून “अब काहेको धूम,मचाते हो,दुखवाकर भारत सारे,आते है नाथ हमारे,झुटी गुलाम शाही,क्या डर दिखा रही है”अश्या खंजेरी भजनाच्या मध्यमातून क्रांतीची मशाल पेटविली व त्याचप्रमाणे चीनचे युद्ध असो की पाकिस्तानचे आक्रमण प्रत्येक आणीबाणीत राष्ट्रसंत देश्याच्या सीमेवर जवानांना प्रोत्साहन देण्यासाठी हजर असायचे.त्याचप्रमाणे कुठे दुष्काळ असो की भूकंप सर्वत्र तुकडोजी महाराज दौरे करून जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी जातीने हजर असायचे.

जनतेसाठी ग्रामगीता युग ग्रंथ लिहून जनतेच्या समस्या चे निवारण करण्याचे महत्तम असे कार्य केले.एवढ्या मोठ्या महापुरुषाला देशाचे राष्ट्रपती यांनी तुकडोजी महाराज यांना राष्ट्रसंत म्हणून गौरव उद्गार काढले आहे.त्यामुळे समस्त गुरुदेव सेवकांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना भारतरत्न पुरस्कार देऊन त्यांच्या कार्याचा सर्वत्र प्रचार-प्रसार करावा ही मागणी उचलुन धरली आहे. यावेळी निवेदन देतांना डॉ.एन.एस. कोकोडे,डॉ.डी.एच.गहाणे, ऍड.मनोहराव उरकुडे,ऍड आशिष गोंडाने,प्रा.डॉ.धनराज खानोरकर,प्रा.बालाजी दमकोंडावार,सयाम गुरुजी, नामदेवराव ठाकूर,श्री.तेजराम बघमारे,विलास सावरकर,रवीभाऊ उरकुडे, गिरीधर अलबनकार,विजय भोयर,मोरेश्वर उईके,अतुल राऊत,सीतारामजी देशमुख, शंकर निमकर आदि मंडळी प्रामुख्याने हजर होते.