विद्युत कंत्राटी कामगारांचे प्रश्न सोडवण्यास महाराष्ट्र राज्य स्वतंत्र विद्युत कंत्राटी कामगार संघटनेला मोठ यश

37

🔸या कार्याला जन आधार अधिवक्ता संघ, चंद्रपूर यांचाही महत्त्वाचा हात

✒️नितीन रामटेके(विशेष प्रतिनिधी)मो:-8698648634

भंगाराम तळोधी(दि.16नोव्हेंबर):- दिनाक 14/11/2020 मा. आयु. सुधाकर तेलसे,साहेब कामगार नेता, यांनी सर्व CSTPS विद्युत कंट्राती कामगारांना इतिहासिक न्याय हक्क मिळवून दिला आहे.स्थापत्य परिरक्षण विभाग व कोलशम्पलिंग विभाग मधील कंट्राती कामगार ला उर्जानिर्मिती कंपनी च्या सर्कुलर प्रमाणे किमान वेतन व इतर भत्ते; देण्यात येत नव्हते; आणि विद्युत कंट्राती कामगार चे आर्थिक सामाजिक शोषण करण्यात येत होते ,पण महाराष्ट्र राज्य स्वतंत्र विद्युत कंट्राती कामगार संघटने चे कार्यध्यक्ष. आयु. सुधाकर तेलसे साहेब, यानी किमान वेतन व इतर भत्ते ची मागणी महाराष्ट्र शासन व विद्युत प्रशासन कड़े 3 जानेवारी 2020 पासून माई सावित्रीबाई फुले जयंती दीनी.. पाठपुरावा केला.

तसेच सबंधित ऊर्जा खात्याचे मंत्री नामदार डॉ. नितिन राऊत साहेब. सोबत गणराज्य दिनी..26 जानेवारी 2020 ला नागपुर इथे भेट घेतली व सबंधित कामगार प्रश्न सोडवणूक करण्याचा मागणी केली. आणि निवेदन देण्यात आले.मा. कामगार मंत्री नामदार. बचुभाऊ कडू साहेब, यानाही या प्रकरणाचे निवेदन देण्यात आले. याची गंभीर दखल मा. कामगार मंत्री नामदार बचुभाऊ कडू साहेब यांनी घेतली आणि महाराष्ट्र विद्युत प्रशासन ला कंट्राती कामगार ला किमान वेतन व इतर भत्ते देण्याचे आदेश दिले.

विद्युत कंत्राटी कामगारांना हा मिळवून दिलेला न्याय त्यांच्यासाठी अतिशय मोलाचा आहे. सबंधित या प्रकरणात मा. शेखर गजभिये साहेब, मा. पी. एस. खोब्रागडे साहेब, अमरावती जिल्हा तसेच महाराष्ट्र कामगार मंत्री चे प्रशासकीय सलाहगार; सचिव मा. भटकर साहेब यानी मोलाची कामगिरी केली. आणि गरीब विद्युत कंट्राती कामगार न्याय देण्यास पूर्ण पणे जातिने लक्ष्य दिले आणि प्रकरण निकली काढले,, दिनाक ,14 ऑक्टोम्बर 2020 धम्मचक्र परिवर्तन दीनी आयु सुधाकर तेलसे यानी विजय प्राप्त केला..हा इतिहासिक निर्णय कामगार ला, न्याय दिला व कंट्राती कामगार आर्थिक सामाजिक शोषण थाबविले.

महाराष्ट्र राज्य स्वतंत्र विद्युत कंत्राटी कामगार संघटनेचे वरिष्ठ पदाधिकारी, व विद्युत कंत्राटी कामगार कडून, अध्यक्ष मा. जयंत गाडगे साहेब, कार्याध्यक्ष मा. सुधाकर तेलसे साहेब, मा. रमेशभाऊ फाले साहेब, उपाध्यक्ष मा अजबराव सुर्यवंशी साहेब कोषयाध्यक्ष मा प्रदीप राऊत साहेब .सहसचिव मा शंकर तंबाखे साहेब. मुख्य सलाहगार मा दिलीप फरकाडे साहेब मा किशोर कातकर साहेब मा गजानन सावसाकडे साहेब, निजी सचिव मा शिवपाल रामटेके साहेब; संघटनेचे सदस्य मा. गुड़ु डोंगरे साहेब, मा. नरेश देवगड़े साहेब, मा. पुंडलिक झाड़े साहेब, मा. परशुराम खोब्रागडे साहेब, मा. शंकर कातकर साहेब, मा. झावरु कातकर साहेब, मा. दिलीप कुलमेथे साहेब, मा. बलवंत मोरे साहेब, मा. नितिन वाढई , मा. तुलशिराम निकोले साहेब, मा. दयनेस्वर वनसिंग साहेब, यांना अभिवादन करून धन्यवाद मानले आहे. तसेच जन आधार अधिवक्ता संघ, चंद्रपूर समितीचे सदस्य ॲड. विपिन श्रावण रामटेके, ॲड. अतुल भांबोरे, ॲड. मीनाक्षी राजीव लोहेकरे, ॲड. राहुल मेढे, ॲड.सूरज वाळके, ॲड. वेनुदास वावरे, ॲड. वाणी दारला, ॲड.सचिन उमरे, ॲड. श्याम नागतुरे, ॲड. पंकज दहागावकर ॲड. शमा पठाण, ॲड. सरिता मेकलवार, ॲड. प्रशांत गोहणे, ॲड. अमोल जिवतोडे, ॲड. रमण पुणेकर, ॲड. बबलू मेश्राम, ॲड. चंदनखेडे, ॲड. सागर खोब्रागडे, ॲड. प्रफुल ई. सदस्यांनी केलेल्या कार्याचे विद्युत कंत्राटी कामगारांनी धन्यवाद मानले.