जनसहयोग रोटी , कपडा आणि टिफिन बँक, दोंडाईचा

64

🔹एक आदर्शवत उपक्रम

✒️संजय कोळी(दोंडाईचा प्रतिनिधी)मो:-9075716526

दोंडाईचा(दि.16नोव्हेंबर):-दिवाळीनिमित्त श्रीमती ताई साहेब जमादार यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ चिवडा व लाडूची १२५ पाकिटे माननीय सरकारसाहेब रावळ यांच्यातर्फे दोन दिवसात वाटण्यात आली. त्याच प्रमाणे माननीय श्री के. एम्. अग्रवाल यांच्यातर्फे ५० चिवडा पाकिटे वाटण्यात आली. त्याचबरोबर रोजच्या प्रमाणे ४० फुड पॅकेट्स ही देण्यात आली.

जनसहयोग कपडा बँकेतर्फे दर रविवार प्रमाणे आज जुने वापरता येणे योग्य कपडे वाटण्यात आले . माननीय सरकार साहेब रावळ यांच्या भगिनी सौ. विजू ताई ,माननीय श्री अशोक बाविस्कर साहेब , श्री संजय चौधरी, श्री एम्. बी . बोरसे सर यांच्यातर्फे कपडे देण्यात आले.

जन सहयोग टिफिन बँक दिनांक २ ऑगस्ट २०२० पासून १० व्यक्तींना जेवणाचे टिफिन पुरवत असते . त्यात आजपासून ५ टिफिन वाढवण्यात आले. त्यासाठी मा. श्री संग्राम सिंह राजपूत व मा.श्री हितेंद्र महाले यांनी एक वर्षासाठी मदत देण्याचे कबूल केले.