कुरखेडा येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी गोड दिवाळी

34

🔸उद्योजक जवाहर सोनकुसरे यांचे राष्ट्रवादीत प्रवेश

🔹आमदार धर्मराव बाबा आत्राम यांनी पक्षाचे दुपट्टा घालून केले स्वागत

✒️राहुल डांगे(विशेष प्रतिनिधी)मो:-9850801314

गडचिरोली(दि.16नोव्हेंबर):- कुरखेडा तालुक्यातील भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते वामदेवराव सोनकुसरे यांचे चिरंजीव उद्योजक जवाहर सोनकुसरे हे दीपावलीच्या शुभ पर्वावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केले असून रविवार 15 नोव्हेंबर रोजी अहेरीच्या राजवाड्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष तथा आमदार धर्मराव बाबा आत्राम यांनी जवाहर सोनकुसरे यांचे व त्यांच्या समर्थकांचे पक्षाचा दुपट्टा गळ्यात घालून स्वागत केले व पक्ष विस्तारासाठी आणि पुढील वाटचालीसाठी सोनकुसरे व त्यांच्या समर्थकांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिले.

यावेळी प्रामुख्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष रवींद्र वासेकर, रा.काँ. सेवादलचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर बारापात्रे,सरचिटणीस जगन जांभुळकर, हरिदास गेडाम, कबीर शेख, अहेरीचे तालुकाध्यक्ष श्रीनिवास विरगोनवार आदी मान्यवर उपस्थित होते.

ऐन दिवाळीच्या हंगामात जवाहर सोनकुसरे हे आपल्या समर्थकांसह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केल्याने कुरखेडा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी गोड दिवाळी असून त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रवेशामुळे कुरखेडा तालुक्याला अजून नवी बहर येणार आहे.

सोनकुसरे परिवार स्वदेशी तसेच गृह उद्योगांना वाव देणारे असून स्व. राजीव भाई दीक्षित यांच्या विचारांना मानणारे आहेत, सहकारी व शिक्षण संस्था त्यांच्याकडे असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला उद्योजक जवाहर सोनकुसरे यांच्या रूपाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रवेशाने पक्षाला मोठा फायदा मिळणार आहे.