सत्य साई बाबा दर्शन

36

२३ नोव्हेंबर हा सत्य साई बाबाचा जन्मदिवस. संपूर्ण जगात साईचे भक्त हा दिवस मोठ्या श्रध्देने,समर्पित भावनेने,आनंदपूर्ण वातावरणात ५ दिवस अगोदरच विविध उपक्रम घेऊन साजरा करतात.मात्र यावर्षी कोरोनाचे संकट असल्यामुळे सार्वजनिक उपक्रमे न घेता फक्त आनलॉईन उपक्रम घेण्यात येत आहेत. सत्यसाई बाबांचे जवळ जवळ १८० देशात भक्त पसरले आहेत. विशेष म्हणजे हे त्या त्या प्रांतातील स्थानिक भक्त आहेत.बाबा भारत देश सोडून कधीही बाहेर गेलेले नाहीत. फक्त आफ्रिकेतील नौरीबी,कंपाला येथे ३० जून १९६९ ला त्यांचे सत्य साई स्कूल सेंटरचे उद् घाटन करण्यासाठी गेलेले होते.

एवढा एकमेव परदेश दौऱ्याचा भाग त्यांच्या आयुष्यातील आहे. तरीही बाबांचे परदेशात लाखो भक्त आहेत.आणि त्यांचे कार्य करत आहेत. हा एक चमत्कारच म्हणावा लागेल. हे विदेशातील भक्त पुट्टपर्तीला बाबांच्या दर्शनाला नेहमी येतात.येथे १५ दिवस ते एक-दोन महिने राहतात.आणि सणाच्या वेळी तर हे भक्त हजारोंनी येतात. विदेशी भक्तांची येथे खूप रेलचेल असते. विशेषत: ख्रिश्मस,बौध्द पौर्णिमा या फेस्टीवेलच्या वेळी तर जास्त संख्येने दिसतात.

या देशातील हिंदू म्हणवून घेणारे ९५ टक्के लोकांना भारतीय संस्कृतीचा अभ्यास नाही.मात्र येथे येणारे बाबांच्या परदेशी भक्तांना वेदांचा अभ्यास आहे.त्यांना वेद चांगल्या प्रकारे मुखोद्गत आहेत. उच्चारसुध्दा आपल्या प्रमाणे अस्सल अवगत केलेले आहेत. भारतीय संस्कृतीप्रमाणे हे भक्त भारतीय पांढरा पोषाख परिधान करतात. नव्हे तर यांना ती नेहमीची सवय झालेली आहे.जेवणापुर्वी ते नमस्कार करून ब्रम्हापर्ण करतात. त्याशिवाय मुखात घास ठेवत नाहीत.ते साई साहित्याचा अभ्यास सतत करतांना दिसतात. साईनी दिलेल्या शिकवणीचे ते सद्भावनेने आचरण करतात.हा इथे चमत्कार बघायला मिळतो.या उलट आपले लोक पाश्चात्य संस्कृतीच्या आचरणास बळी पडत आहो.ही शोकांतिका आहे.

सत्यसाईनी पुट्टपर्ती या आपल्या जन्मगावी सर्व धर्मांच्या लोकांना एकत्र जोडलेले आहे.हे त्यांचे विशेष होय.साईचे म्हणने आहे कि, “सर्वांचे धर्म चांगले आहेत. त्या सर्व धर्मांची *मूळ शिकवण* सुध्दा एक सारखीच आहे. सर्व धर्मातच सत्य,प्रेम,शांती,अहिंसा,धर्माचरण पालन हेच सांगितलेले आहे.त्यामुळे माझ्या जवळ येतांनी धर्मांतर करण्याची गरज नाही. तुम्ही ज्या धर्मात आहात. त्याच धर्मात राहून लोककल्याणाचे कार्य करा. तेच परमेश्वराचे कार्य होय.म्हणूनच “समस्त लोका सुखीनौ भवंतु”.जगातील सर्व लोक सुखी रहावेत अशी मंगल कामना ते प्राथेनेतून आपल्या भक्तांना करायला लावतात.अशा प्रकारे सर्व प्रांत,जाती,पाती,धर्माच्या लोकांना त्यांनी आपल्या प्रभावाने एकाछत्राखाली आणले.

या विषयी स्पष्टीकरण देतांना साईंनी घोषित केले आहे कि, “मी कोणाचीही धर्मश्रध्दा विचलित किंवा नष्ट करण्यासाठी आलो नाही.तर प्रत्येकाला त्यांच्या त्यांच्या धर्मश्रध्देतच दृढ करण्यासाठी आलेलो आहे.जेणेकरून ख्रिश्चन हा अधिक चांगला ख्रिश्चन , मुसलमान हा अधिक चांगला मुसलमान,आणि हिंदू हा अधिक चांगला हिंदू बनेल.” म्हणूनच बाबांच्या पुट्टपर्तीतील प्रशांती निलायम येथे(बाबांचे आश्रम) सर्व धर्मांचे महत्त्वाचे सण सारख्याच उत्साहाने,सर्व धर्मांच्या लोकासमक्ष गुण्यागोविंदाने साजरे केले जातात.तसेच भजन समितीमध्ये सर्वधर्माचे एकतरी भजन म्हणने बंधनकारक आहे.

बाबांनी आपल्या वयाच्या १४ व्या वर्षी सर्वासमक्ष घोषित केले कि, “मी धर्माचरणच्या पुनर्स्थापनेसाठी,(ज्यात सध्या कलुषितपणा/स्वार्थीपणा आलेला आहे.तो नष्ट करण्यासाठी),मानवाला सेवा करण्याची प्रेरणा देण्यासाठी, व ईश्वराप्रती प्रेमाची शिकवण देण्याच्या कार्यासाठी अवतरलो आहे.यासाठी त्यांनी “सर्वांवर प्रेम करा,सर्वांची सेवा करा” आणि “सर्वांची मदत करा,कोणालाही दुखवू नका.” हे घोषवाक्य भक्तांना दिले.ही शिकवण त्यांनी स्वत: जन्मभर अंगीकारली.त्यांच्या या कार्याला गती येण्यासाठी त्यांनी प्रशांती निलायम आश्रमात त्यांच्या २५ व्या वाढदिवशी म्हणजे २३ नोव्हेबर १९५० ला “सत्य साई सेवा संघटने”ची स्थापना केली.

“शिक्षण, औषधे,पाणी,हा प्रत्येक व्यक्तीचा जन्मसिध्द हक्क आहे. आणि तो सर्वांना मोफत मिळाला पाहिजे”.असे त्यांचे मत होते. या संघटनेच्या माध्यमातून त्यांनी समाजसेवेचे प्रकल्प कार्य सुरू केले. आज पाहिले तर हे त्यांचे आरोग्य,पाणी,शिक्षण विषयक कार्य दृष्ट लागावी असे कल्पनेच्या पलीकडे झालेले आहे. आणि अजुनही उत्तरोत्तर या कार्यात भर पडत आहे.त्यांनी केलेल्या कार्याचा आपण थोडक्यात आढावा घेऊ.

🔹वैद्यकिय सेवा🔹
आज पुट्टपर्तीला जागतिक दर्जाचे ५४ एकर परिसरात सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल उभे आहे.या हाॅस्पीटल मध्ये हार्ट,नेत्र,युरोव आर्थ्रो,या संबंधीचे विकारावर आपरेशन व उपचार गरीब,श्रीमंत,जात,पात,धर्म न पाहता एक पै सुध्दा न आकारता मोफत केल्या जातात.अशाच प्रकारचे संघटनेचे सुपर हास्पीटल बेंगलुर,रायपूर येथेही आहे.याशिवाय संघटनेमार्फत सत्यसाई मोबाईल मेडीकल हास्पीटल हे ग्रामीण भागासाठी चालविले जाते.हे सर्व कार्य मोफत होते.याच जाळे संपूर्ण भारतात पसरलेले आहे. जिल्हा संघटनेच्या मागणीप्रमाणे राज्य संघटनेने प्रत्येक जिल्ह्यात मेडीकल हाॅस्पिटल व्हाॅन मोफत उपलब्ध करून दिलेली आहे.

या प्रकल्पासाठी औषधींचा पुरवठासुध्दा राज्य संघटनेकडून मोफत होतो. फक्त डाॅक्टर, फार्मषिस्ट,ड्रायव्हर,आणि ४ सेवादल यांची आवश्यकता या गाडीवर लागते.ही गरज बहुतेक साईभक्ताकडून भागविली जाते.सदर मेडीकल व्हाॅन सेवादल पथकासह ग्रामीण भागात हप्त्यात ४ ते ५ दिवस जाते. हिच्याद्वारे आजारी लोकांवर उपचार व मार्गदर्शन मोफत केल्या जाते.साईभक्तांकडून या प्रकल्पाचा भाग म्हणून मोफत रोगनिदान उपचार, रक्तदान,शस्त्रक्रिया इ. शिबीरे वारंवार घेतलेल्या जातात.

🔸पिण्याचे पाण्याचे प्रकल्प🔸
आंध्र प्रदेशातील अनंतपूर जिल्ह्यात बाबांनी ७३१ गावात शुध्द पिण्याचे पाणी पुरवठा(नळयोजना) प्रकल्पाद्वारे केला आहे.तेलंगणा राज्यातील मेडक व मेहबूब नगर जिल्ह्यात ३२० गावात पाणी पुरवठा केलेला आहे.व इतर ठिकाणी ५०० असे एकूण १५०० गावांना नळाद्वारे पाणी पुरवठा योजना २०१३ पर्यंत दिलेली आहे.चेन्नईसारख्या शहराला सुध्दा संघटनेने कडून नळ पाणी पुरवठा केला जात आहे. एवढेच नाही तर या प्रोजेक्टची देखभाल व दुरुस्ती सत्य साई सेंट्रल ट्रस्ट स्वत:च करीत आहे. यासाठी शासनाकडून व लोकांकडून कसलेही अनुदान किंवा शुल्क घेत नाही.याशिवाय पुरग्रस्तासाठी मोफत घरे बांधून देणे.

🔹नित्यआनंद प्रसाद पथकम🔹
ही योजना स्वामींनी २३ नोव्हेंबर २०१० साली खेडेगावातील लोकांसाठी मोफत भोजन सेवा पुट्टपर्तीच्या परीसरात सुरू केलेली आहे. ह्या सेवेचा लाभ जवळ जवळ १५०० लोक रोज घेतात .ही सेवा अखंडीत सुरू आहे.

🔸शिक्षण सेवा प्रकल्प🔸
साईंनी हा प्रकल्प १९८१ मध्ये प्राथमिक विद्यालयाचे उद्घाटन करून सुरू केलेला आहे.”शिक्षण हे जीवनासाठी आहे. उपजीविकेसाठी नाही.”हे त्यांचे तत्वज्ञान आहे.आज या प्रकल्पाचा वटवृक्ष होऊन सत्य साई युनिव्हरसिटी म्हणून उभी आहे. आज १७ राज्यामध्ये १००च्या वर सत्य साई विद्यालये/महाविद्यालये उभे आहेत.५०००००च्यावर विद्यार्थी दरवर्षी येथील शाळा/महाविद्यालयात प्रवेश घेतात.येथील शाळा महाविद्यालयात त्यांच्या संस्थेने तयार केलेला *मानवी मुल्यावर आधारीत* हा विशेष अभ्यासक्रम शिकविल्या जातो.या ठिकाणी कला,वाणिज्य,विज्ञान पदवी, पदव्युत्तर,पी.एच.डी. पर्यंत अभ्यासक्रम तसेच एम टेक,एमसीए इ.अभ्यासक्रम उपलब्ध आहेत.

🔹विद्यावाहिनी कार्यक्रम🔹
संपूर्ण भारतामध्ये भावी पिढ्यांच्या संवर्धनासाठी संपूर्ण ज्ञानवर्धक,प्रेरणादायक, आनंददायी असा साई संस्थेद्वारे निर्मित मुल्यावर आधारित शिक्षण कार्यक्रम हा स्वामींनी २३ नोव्हेंबर २०१० पासून सुरू केलेला आहे. साईगुरू हे शिक्षण खेड्यातील शाळेत जाऊन मोफत देत असतात.

🔸बालविकास वर्ग🔸
साईंनी बालकामधील सुप्त गुणांचा विकास होण्यासाठी “बालविकास” हा उपक्रम १९६८ मध्ये सुरू केला.उत्तम सवयी,ओजस्वी व्यक्तिमत्त्व,आंतरिक शक्ती,विचार ,प्राण, आणि वेळ यावर नियंत्रण,ध्यान व प्रार्थना सामर्थ्याचे अनुभवजनीत ज्ञान,सर्व धर्म ऐक्य या गोष्टी या उपक्रमांद्वारे शिकवल्या जातात.बालविकास वर्ग जगातील सर्व देशांत,राज्यात साईभक्तांद्वारे चालविलेल्या जातात.

🔹श्री सत्य साई ईश्वरम्मा वुमन्स वेल्फेअर ट्रस्ट🔹
या प्रोजेक्ट ची स्थापना १८ फरवरी २००५ साली साईच्या संकल्पनेतून करण्यात आली.विधवा,परित्यक्ता अशा महिलांची आर्थीक प्रगती,व सशक्तीकरण करणे त्यांना प्रतिष्ठा प्राप्त करून देणे.हे या प्रकल्पाचे उद्यीष्ट आहे.

🔸मदर व चाईल्ड प्रोजेक्ट🔸
या द्वारे गर्भवती व बाळंतीण महिलांना तसेच बालकांना वैद्यकिय मदत,समुपदेशन,त्यांच्या आरोग्यासाठी आवश्यक असलेले औषधी,व्हिटाॅमिन्स,पुरक आहार,कपडे पुरविणे इत्यादि सेवा या प्रोजेक्ट द्वारे दिल्या जातात. ही सेवा सुध्दा संपूर्ण भारतात साईभक्तांकडून सुरू आहे.

🔹सॅनिटेशन व हायजीन प्रोजेक्ट🔹
या द्वारे खेड्यामध्ये संडास बांधकामासाठी लोकांना प्रोत्साहन देणे व शौचालये सुध्दा बांधून देण्यात येतात.

🔸स्काॅलरशिप स्किम🔸
यामध्ये धर्म, जात,या प्रकारचा कोणताही भेदभाव न करता आर्थिकदृष्ट्या दुर्बल पात्र शाळकरी व महाविद्यालयीन मुलींना स्काॅलरशिप दिलेल्या जाते. तसेच गरजु मुलांना शालेय साहित्याचे वाटप केले जाते.वरील सर्व प्रोजेक्टचे कार्य पुट्टपर्तीतच नाही तर साईभक्तांद्वारे संपूर्ण जगात सुरू आहे.या कार्यासाठी साईभक्त जसा वेळ भेटेल तसा वेळ आपल्या क्षेत्रात देतात.साई सेवेमध्ये साईभक्त वरील सर्व प्रोजेक्टमध्ये स्वत:चा कर्म,वेळ,पैसा निस्वार्थी भावनेने अर्पण करतात.स्वामीचे कार्य असले तरी घरचे कार्य समजून मन लावून करतात.भक्त सेंट्रल ट्रस्ट,राज्य संघटनेकडून कशाचीही अपेक्षा करीत नाहीत.व राज्य संघटना सुध्दा कोणतीही वर्गणी साईभक्तांकडून घेत नाही.

एवढेच नाही तर ही संघटना या कार्यांसाठी कधीच वर्गणीसाठी फिरत नाही.व वर्गणीची स्वत:हून मागणी करत नाही.हे या संघटनेचे आणखी वैशिष्ट्ये होय.सत्य साई बाबा भगवान आहेत.हे साईबाबांनी वयाच्या १४ व्या वर्षी स्वत:च सर्वासमक्ष घोषित केले होते.साईच्या भक्तांची त्यांना आलेल्या अनुभवांमुळे सत्यसाई हे भगवान असल्याची गाढ श्रध्दा आहे. भक्तांच्या घरी असलेल्या फोटोतून कधीकधी विभूती(रक्षा),कुंकु,शहद,हळद,चंदन सृजीत होत असल्याचे चमत्कार भक्त सांगतात.असा चमत्कार कधी मधी जगभर होत राहतो.

मात्र काही असो. या साई विभूती कडून जे कार्य उभे आहे. हे कार्य त्यांचे भक्त अजुनही नेटाने पुढे नेत आहेत.या चांगल्या कार्यात अजुनही पुन्हा नवनवीन भर पडत आहे. जुन्या कार्यात कुठेही खंड नाही.हा साई शक्तीचा महान चमत्कारच म्हणावा लागेल.अशा या सेवेसाठी पावन असलेल्या पुट्टपर्तीला जे पर्यटनस्थळ सुध्दा आहे जरूर भेट द्या. येथील निसर्ग सौंदर्य,बाबांनी निर्माण केलेले स्वर्गीय विश्व,हे अनुभवन्यालायक निश्चितच आहे.

✒️लेखक:-डॉ.चंद्रकांत लेनगुरे(गडचिरोली)
मो:-९४२३६४६७४३