समर्थ महाविद्यालय, लाखनी जि.भडारा येथिल रासेयो स्वयंसेवकांची दिल्ली प्रजासत्ताक पथसंचलनासाठी निवड

112

✒️भंडारा(पुरोगामी संदेश नेटवर्क)

भंडारा(दि.18नोव्हेंबर):-समर्थ महाविद्यालय, लाखनी येथील राष्ट्रीय सेवा योजना विभागातील स्वयंसेवक मनीष होमराज बोरकर बी. कॉम. याची दिल्ली येथील प्रजासत्ताक पथसंचलन साठी निवड करण्यात आली. रातुम नागपूर विधापीठ नागपूर द्वारे शारीरिक, बौद्धिक चाचणी घेऊन मुलाखती द्वारे सदर निवड करण्यात आली.

पूर्व प्रजासत्ताक संचलन शिबीर दि. 20 ते 29 नोव्हेंबर या कालावधीत अनुराग विद्यापीठ वेंकटापुर, घटकेसार, हेदराबाद ( तेलंगणा राज्य) येथे आयोजित करण्यात आले असून सदर शिबीराकरिता दि. 18 नोव्हेंबर 2020 रोजी विद्यापीठ संघ रवाना होत आहे.

राष्ट्रीय शिक्षण संस्थेचे अध्यक्ष श्री. आल्हाद भांडारकर प्राचार्य डॉ. संजय पोहरकर, कार्यक्रम अधिकारी प्रा. धनंजय गिऱ्हेपुंजे, सह अधिकारी प्रा. डॉ. बंडू चौधरी तसेच महाविद्यालयाचे सर्व घटकांनी अभिनंदन करून शुभेच्छा व्यक्त केल्या.