राजेश पवार नायगाव विधानसभा आमदार म्हणून नाही तर कुटुंबातील एक सदस्य म्हणून दिव्यांग बंधु-भगिनी सोबत काल दिवाळी साजरी केली

31

✒️माधव शिंदे(नांदेड,जिल्हा प्रतिनिधी)मो:-7757073260

नांदेड(दि.19नोव्हेंबर):-समाजातील दुर्लक्षित व दुर्लब घटकांना न्याय भेटावा “याच साठी केला होता अट्टहास”नायगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार श्री. राजेश पवार साहेबांनी काल बरबडा येथील दिव्यांगांसोबत दिवाळी साजरी करून, आपल्या स्वभावातील संवेदनशीलता परत एकदा सर्व जनतेस दाखवून दिली.

प्रत्येक दिव्यांग बंधु भगिनींना मिठाई व बॅटरी याचे वाटप केले. मा.आमदार श्री. राजेश पवार साहेबानी स्वःतहून दिव्यांगापर्यंत पोहचून त्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी सदैव प्रयन्तशील राहणार या शब्दात दिव्यांग बंधु भगिनींना आश्वस्त केले आणि त्याच्यासोबत दिवाळी साजरी केली.

या प्रसंगी श्री दिलीपराव धर्माधिकारी, श्री सदाशिव पचलिंग, श्री रूद्रवाड सर, जि प सदस्या सौ. पुनमताई पवार, माधव कोलगणे, बालाजी घोसलवाड , मधुकर घोसलवाड, प्रभाकर शेटे, सतीश सिंगेवाड, सतीश हणमंते, माधव शेटे, संतोष शेटे, वीरभद्र कंधारे, संजू प पचलिंग, दत्ता माधव शिंदे दिव्यांग शक्ती नांदेड जिल्हा प्रतिनिधी व बरबडा येथील सर्व दिव्यान बंधू व भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.