दिव्यांग वृध्द निराधार मित्र मंडळ महाराष्ट्र शाखा भेंडेगाव येथे बोर्डाचे अनावरण

31

🔹संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटील कुंचेलीकर यांची प्रमुख उपस्थिती

✒️माधव शिंदे(नांदेड,जिल्हा प्रतिनिधी)मो:-7757073260

नांदेड(दि.19नोव्हेंबर):-लोहा तालुक्यातील भेंडेगाव येथे दिव्यांग वृध्द निराधार मित्र मंडळ महाराष्ट्र या शाखेचे उदघाटन मेळावा संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल कुंचेलीकर यांच्या हस्ते संपन्न झाला. व दिव्यांग बांधवांचा मेळावव्याचे अध्यक्ष दिव्यांग वृध्द निराधार मित्र मंडळ महाराष्ट्र जिल्हा अध्यक्ष ज्ञानेश्वर नवले हे होते. कार्यक्रमाचि सुरूवात रयतेचा राजा श्री छञपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालुन बोर्डाचे अनावरण संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल यांच्या हस्ते करण्यात आली.

गावकर्‍यांच्या वतीने प्रमुख पाहुणे यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. शाखेचे सचिव सुरज कांबळे यांनी प्रस्थाविक केले त्यांनी बोर्ड अनावरण करण्याचा उद्देश स्पष्ट करुन दिव्यांग वृध्द निराधार बांधवांनी आपली संघटितपणे संघर्ष करण्यासाठी संस्थापक अध्यक्ष डाकोरे पाटिल करीत असलेल्या चळवळीत सर्वानी सहभागी होऊन हक्काच्या सवलती घ्याव्यात असे आव्हान केले. संस्थापक अध्यक्ष डाकोरे पाटिल यांनी आपल्या संघटित संघर्षामुळे आपणास गाव पातळीवर न मिळणारा निधी दरवर्षी मिळत आहे.

पण ज्या लोकप्रतिनिधी यांना आपण खासदार, आमदार, केलात त्यांनी संसदेत दिव्यांची बांधवांना दरवर्षी खासदार. आमदार निधी देण्यात यावा असा संसदेत कायदा करून तेच अंमलबजावणी करीत नाहीत अशा चाळीस योजना कागदोपञी राहात असल्यामुळे,सर्वानि जागे होणे काळाची गरज असल्यामुळे गावागावात दिव्यांग जागा होण्यासाठी सर्वानी एकजुटीने दिनदुबळ्याच्या लढाईत सहभागी व्हावे असे आव्हान संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल यांनी केले.

जी अध्यक्ष ज्ञानेश्वर नवले यांनी संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल यांच्या नेतृत्वाखाली नांदेड जिल्ह्यात आठावन्न अनेक प्रकारचे सनदशीर मार्गाने आंदोलन केल्यामुळे दिंव्यांग बांधताना न्याय मिळाला आहे .गावागावात दिव्यांग बांधवांनी क्रांती करुन आपला हक्क घेण्याचे आवाहन केले.

या कार्यक्रमात संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल,जि अध्यक्ष ज्ञानेश्वर नवले नादेड ता अध्यक्ष गजानन हंबर्डे, लोहा तालुक्यातील अध्यक्ष पांडुरंग कोल्हे, उपअध्यक्ष शेख हानिफ, पाताळे, शाखा प्रमुख लिंबाजी लिंबटकर,ऊपप्रमुख किसन हेंडगे, सचिव सुरज कांबळे,सहसचिव भुजंग कोल्हे कोषअध्यक्ष प्रभु मोरे, महिला अध्यक्ष महानंदा लांडगे, म.उप अ.सुंदरबाई पवार, म. सचिव अनिता कदम म सहसचिव गोदावरी लिंबटकर, महेंद्र लिबटकर,राजु लिबकर गावातील नागरिक उपस्थित होते.