नाट्य नरेश रंगभूमीचा कोरोना नंतरचा दमदार शुभारंभ

35

🔸29 नोव्हेंबर रोजी “हा खेळ संसाराचा ” – या वर्षीचे प्रथम पुष्प

✒️रोशन मदनकर(उप संपादक)मो:-8888628986

ब्रम्हपुरी(दि.20नोव्हेंबर):- जगभरात कोरोनामुळे हाहाःकार माजला असतांना अनेक कंपण्या बंद पडल्या . तिन्ही प्रकारच्या परिवहन सेवा बंद पडल्या.अर्थात जग एका गोठलेल्या स्थितीत असल्यासारखे झाले.. त्यात अनेकांचे कामधंदे बुडले.अनेकांना भुकमरी सोसावी लागली.अन्य हालाकीच्या परिस्थितीला सामोरे जावे लागले. अशा भिषण परिस्थितीची झळ सिनेसृष्टी अथवा नाट्यसृष्टीतील कलावंतांनाही सोसावी लागली.

गेल्या सहा महिन्यांपासून बंद असलेले नाट्यगृहाचे पडदे आता उघडण्यासाठी शासनाने परवानगी दिली . ही झाडीपट्टीच्या कलावंतांसाठी दिलासादायक बातमी आहे.सध्या झाडीवुडच्या नाट्यसृष्टीचा पडदा उघडला आहे. तरी फार थोड्या नाट्य रंगभूमीच्या तारखा बुकिंग झालेल्या आहेत.

मा. प्रकाश प्रधान यांच्या “नाट्य नरेश रंगभूमीने” सुद्धा कोरोना नंतर दमदार शुभारंभ केला आहे . मौजा निलज फाटा येथे “हा खेळ संसाराचा ” या प्रकाश प्रधान लिखित नाटकाचा प्रयोग दि. 29/11/2020 ला रात्री दहा वाजता आयोजित केलेला आहे.

यात शासनाने आखून दिलेल्या निमावलीच्या अधिनिस्त राहून मास्क ,सॕनिटायजर आणि आवश्यक तेवढे अंतराची बंधने पाळून नाटकाचे आयोजन केले जाणार असल्याचे ” प्रेरणा नाट्य कला मंडळ निलजच्या ” वतीने करणार असल्याचे निर्माते मा. संजूमामा यांनी कळवले आहे.

सदर नाट्य प्रयोगात मा. संजुमामा , राज गायकवाड ,सुरेंद्र बोरकर ,चेतनकुमार , रोशनकुमार पिलेवान ,दिलखुश कुनघाडकर ,हरिष वाळके ,एस.के.शिला , मधुचंद्रिका ,प्राजक्ता , शुभांगी या वर्षीचे पहिले पुष्प गुंफणार आहेत.