पूर्वजांचे संस्कार भावी पिढीला मार्गदर्शक-कुलसचिव डॉ. दामोधर राउत

28

🔹गंगाबाई तलमले महाविद्यालयात प्रतिमा अनावरण सोहळा संपन्न

रोशन मदनकर(उप संपादक)मो:-8888628986

ब्रह्मपुरी(दि.20नोव्हेंबर):- येथील स्थानिक गंगाबाई तलमले महाविद्यालयात डॉ. दामोधरजी राऊत कुलसचिव, महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ, नागपूर यांचे हस्ते स्व. वातूजी तलमले व स्व. गंगाबाई तलमले यांच्या फोटोचे अनावरण करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा. तुळशीराम तलमले हे तर प्रमुख अतिथी म्हणून ताराचंद राऊत, प्रदीप तलमले, प्रा.डॉ.राकेश तलमले अध्यक्ष रयत बहुउद्देशीय शिक्षण संस्था ब्रम्हपुरी, डॉ. केतन तलमले प्राथ. आरोग्य केंद्र कुरखेडा, प्राचार्य मंगेश देवढगले, रोशनजी तलमले आदी उपस्थित होते.क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमांना माल्यार्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. प्रास्ताविक प्राचार्य मंगेश देवढगले यांनी केले.

त्यानंतर स्व. गंगाबाई तलमले व स्व. वातूजी तलमले यांचे फोटोचे अनावरण डॉ.दामोधरजी राऊत यांच्या हस्ते करण्यात आले. अनावरण प्रसंगी बोलताना डॉ. दामोधर राऊत म्हणाले की पूर्वजांकडून मिळालेले संस्कार भावी पिढी करिता मार्गदर्शक असतात. स्व. गंगाबाई व वातुजी तलमले यांचा नातू या नात्याने त्यांच्याकडून नियोजन बद्ध जीवन कसे जगावे याचे बाळकडू आम्हाला मिळाले. आमच्या यशात त्यांच्या कडून मिळालेले संस्काराचा सिहांचा वाटा आहे.

रयत बहुउद्देशीय शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रा. डॉ. राकेश तलमले प्रमुख अतिथी म्हणून बोलताना म्हणाले की, स्व. गंगाबाई व स्व. वातूजी तलमले हे आमचे प्रेरणास्त्रोत आहेत, त्यांच्याकडून मेहनत, काटकसर, जिद्द, आत्मविश्वास आदी गुण प्रत्येकाने आत्मसात करावे असे आहेत. अध्यक्षीय भाषणात प्रा. तुळशीराम तलमले म्हणाले की, माझे आई-वडील स्व. गंगाबाई व स्व.वातुजी तलमले यांच्या विचारातूनच आम्हाला सामाजिक, शैक्षणिक क्षेत्राची आवड निर्माण झाली. जीवन जगण्याच्या परिपाठच त्यांच्याकडून प्राप्त झाला.

या कार्यक्रमाला तलमले परिवारातील सदस्य, महाविद्यालयातील प्राध्यापक, कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन प्रा. नंदेश्वर यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा. हर्षा बगमारे यांनी केले.