पुणे विभाग शिक्षक मतदारसंघात श्री नंदकिशोर बबनराव गायकवाड यांच्या उमेदवारीने नवचैतन्य

56

✒️पूणे(पुरोगामी संदेश नेटवर्क)

पुणे(दि.20नोव्हेंबर):- नेहमीच्याच पांढरपेशी शिक्षक आमदारामुळे मरगळलेल्या शिक्षक बंधु भगिनी मध्ये आपल्यातीलच एक *”आपला माणूस”* शिक्षक विधानपरिषद निवडणूक लढवीत असल्याने उत्साह संचारला आहे.
*श्री नंदकिशोर बबनराव गायकवाड* हे महाराष्ट्र माध्यमिक डी एड महासंघाचे कार्याध्यक्ष असून रयत सेवक मित्र मंडळ साताराचे सचिव म्हणून शिक्षकांच्या विविध प्रश्नांवर सनदशील मार्गाने झगडत आहेत. नोकरीच्या निमित्ताने *पुणे,सातारा,सांगली,कोल्हापूर व सोलापूर या पाचही जिल्ह्यात* त्यांची *संघर्षशील शिक्षक* म्हणून ओळख आहे.

सन 2005 नन्तर नियुक्त सर्वच कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन मिळणे, माध्यमिक शाळांची सुस्पष्ट सेवाजेष्ठता, शिक्षणसेवक मानधनात वाढ, अतिरिक्त शिक्षकांची नियुक्ती पासून सेवाजेष्ठता, विनाअनुदानित शाळांना प्रचलित पद्धतीने अनुदान, दिव्यांग बंधु भगिनिंच्या समस्या, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची पदभरती, शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना शैक्षणिक अर्हतेनुसार पदोन्नती, वरिष्ठ श्रेणी निवड श्रेणी व कला शिक्षकांना पदवीधर वेतनश्रेणी, 6वी ते 8वी च्या शिक्षकांना पदवीधर वेतनश्रेणी तसेच सर्वच शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना कॅशलेस मेडिक्लेम आदी मागण्यांसाठी श्री नंदकिशोर बबनराव गायकवाड यांची सतत धडपड असते.

*शताब्दी वर्षाच्या निमित्ताने रयत मधून शिक्षक आमदार व्हावा आणि इतिहास घडावा ही सर्वच रयत सेवकांची तळमळ आहे.* अशावेळी नेहमीच शिक्षकांच्या प्रश्नाकरिता चळवळीत सक्रिय असणाऱ्या श्री नंदकिशोर बबनराव गायकवाड यांच्या रूपाने रयत सेवकांच्या व पुणे विभागातील सर्वच शिक्षक बांधवांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. *आम्हाला राजकीय वरदहस्त असणारा उमेदवार नकोय तर आम्हाला आमच्यातील आमच्या समस्यांची,प्रश्नांची जाणीव असणारा आमचा माणूस श्री नंदकिशोर गायकवाड हेच योग्य उमेदवार आहेत अशी भावना शिक्षक वर्गामध्ये निर्माण झाली आहे.

* यावेळी दमदार आमदार विधानपरिषदेत पाठवण्यासाठी मजबूत इराद्याने पुणे विभाग शिक्षक मतदारसंघातील शिक्षक कामाला लागले आहेत. *कोणतेही राजकीय व आर्थिक पाठबळ नसतानाही केवळ जनाधाराच्या जोरावर श्री नंदकिशोर गायकवाड* विधानपरिषदेत जाऊन इतिहास घडेल यात शंकाच नाही.

*निवडून आल्या नंतर सर्व कर्मचाऱ्यांना जोपर्यंत जुनी पेन्शन मिळत नाही तोपर्यंत आमदारकीची पेन्शन घेणार नाही असे श्री नंदकिशोर गायकवाड यांनी जाहीर केले आहे.*