रश्मी हेडे यांना स्त्री प्रतिष्ठा साहित्यिक पुरस्कार प्रदान

26
✒️सांगली(पुरोगामी संदेश नेटवर्क)

सांगली(दि.24नोव्हेंबर):-कोरोनाचे सावट असल्यामुळे प्रतिष्ठा फौंडेशनचा चौथा राज्यस्तरीय स्त्री प्रतिष्ठा सन्मान सोहळा २०२० अगदी साधेपणाने मात्र तितक्याच उत्साहात सांगली येथे नुकताच पार पडला. सर्व स्तरातील विरोध झुगारून स्त्रियांनी कर्तृत्व सिद्ध करावे,असे आवाहन राष्ट्रीय महिला काँग्रेसच्या महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस, अनाथांच्या माई जेष्ठ समाजसेविका ऍड.मनीषा रोटे ( माई ) यांनी प्रमुख पाहुण्या म्हणून बोलताना केले.त्या पुढे म्हणाल्या की ,दहा अंगानी स्त्री ही संसार करत असते परंतु ती सामाजिक,राजकीय अथवा इतर कोणत्याही क्षेत्रात पाऊल ठेऊ लागली की तिला शारीरिक व मानसिक विरोधाला समोर जावे लागते.

परंतु या सगळ्यात मात करून स्त्रियांनी पुढे आले पाहिजे.आपले कर्तृत्व सिद्ध केले पाहिजे.त्यांच्या हस्ते सर्व क्षेत्रातील महिलांना पुरस्कार प्रदान करण्यात आले. प्रतिष्ठान फौंडेशन विषयी आवर्जून सांगण्यासारखी गोष्ट म्हणजे कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन न करता तुळसीला पाणी घालून करण्यात आली . तसेच प्रमुख पाहुण्याना सन्मान चिन्ह देऊन सर्व पत्रकार मंडळी व इतर फौंडेशनचे सभासद यांचे स्वागत ज्ञान रुपी पुस्तक देऊन करण्यात आले. जणू आधुनिक विचारांची ज्योत त्यांनी मनामनात रुजवली ही अतिशय कौतुकाची गोष्ट वाटली.रश्मी उल्हास हेडे ह्यांना साहित्यिका व शिक्षिका पुरस्कार प्रदान करण्यात आला. या पुरस्काराचे स्वरूप सन्मान चिन्ह व प्रशस्तीपत्रक व पुस्तक असे आहे.

ह्या पुरस्काराचे श्रेय त्या प्रथम त्यांचे पती व त्यांचे सर्व कुटुंबियांना देतात ज्यांची नेहमीच त्यांना साथ मिळाली,प्रोत्साहन दिले व समजून घेतले. तसेच त्यांचे साहित्यिक गुरू माननीय देवेंद्र भुजबळ सरांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले,त्यांनी सहकार्य केले, वेळोवेळी सूचना व सल्ला दिला, त्यांच्यातील लेखिकेला जागृत केले त्यामुळेच त्या इथं पर्यंत पोहचू शकल्या असे त्यांना वाटते. त्यांच बरोबर सर्व मैत्रिणींच्या, वाचकांच्या प्रेरणादायी शब्दांनी त्यांचे मनोबल वाढवले. तसेच सौ आशाताई कुंदप, अशोककाका कुंदप व सौ अलकाताई भुजबळ ह्या सर्वांच्या त्या अत्यंत ऋणी आहेत सर्वांच्या सहकार्यमुळे अशक्य गोष्टी ही शक्य होत गेल्या.

हा पुरस्कार म्हणजे त्यांच्या कामाची पोच पावती असली तरी ही खरी सुरवात आहे असे त्यांना वाटते कारण आता जबाबदारी अजून वाढली आहे, लोकांच्या अपेक्षा, त्यांचा विश्वास आज सार्थ करायचा आहे त्यामुळे अधिक जोमाने काम केले पाहिजे.कष्ट,चिकाटी व प्रामाणिकपणा असेल तर प्रगती निश्चित असते.या कार्यक्रमास विविध मान्यवर उपस्थित होते.