न्याहळोद येथे आदिवासी टोकरे कोळी वधु वर परिचय मेळावा संदर्भात सभा संपन्न

34

✒️संजय कोळी(विशेष प्रतिनिधी)मो:-9075716526

धुळे(दि.24नोव्हेंबर):–आदिवासी विकास संघ व धुळे/ नंदुरबार येथील सर्व संघटनांच्या संयुक्त विद्यमाने आदिवासी टोकरे कोळी नगर नंबर २ न्याहाळोद ता. जि. धुळे येथे सभा घेण्यात आली.त्यावेळेस आदिवासी टोकरे कोळी जमात बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी आदिवासी विकास संघाचे संस्थापक अध्यक्ष प्रा मोतीलाल सोनवणे, नामदेव (आप्पा )येळवे,धुळे जिल्हाध्यक्ष संजय दावळे, सुनिल काशिराम शिरसाठ सर, सुकलाल दौलत शिरसाठ यांनी कार्यक्रम कसा यशस्वी होईल? या संदर्भात विशेष मार्गदर्शन केले. कार्यक्रमात जास्तीत जास्त वधुवर व त्यांचे पालक कसे उपस्थित राहतील? याबद्दल संकल्प करण्यात आला. लॉकडाऊनचा अंदाज घेऊन कार्यक्रमाची तारीख निश्चित केली जाईल असे ठरविण्यात आले.

यावेळी खालील मान्यवर उपस्थित होते. मोहन शिरसा ठ पैलवान डॉ. सुरेश काकुळदे, अशोक दयाराम काकुळदे ,वसंत माणिक शिरसाठ, दिलीप सोनवणे, भाईदास सोनवणे, नितीन बोरसे, लोटन शिरसाठ (फौजी), शिवाजी शिरसाठ, धुडकू डोंगर वाकडे, पंकज वसंत शिरसाठ, गणेश ताराचंद शिरसाठ, दत्तू दयाराम काकुळदे, सुनील शामराव शिरसाठ, निंबा काकुळदे, प्रकाश शिरसाठ, गोकुळ भिला शिरसाठ, पांडुरंग बापू शिरसाठ, ज्ञानेश्वर बापू शिरसाठ, पिंटू चव्हाण (खलनेकर), रमेश शालीग्राम कोळी, धनराज न्हानू कोळी, उमेश भिकन ईशी आसाराम भिका कुवर, इत्यादी मान्यवर उपस्थित होते.