वीजबिल दरवाढ निर्णयाच्या विरोधात म.न.से निफाड तालुक्याच्या वतीने वीज बिले फाडून निषेध

27

✒️विजय केदारे(विशेष प्रतिनिधी)मो:-9403277887

निफाड(दि.24नोव्हेंबर):-कोविड -१९ चा प्रादुर्भाव रोखण्याकरिता करण्यात आलेल्या लॉकडाऊनच्या काळात विजेचा वापर कमी असतांना देखील सरासरी विजबिलाच्या नावाखाली वीजवितरण कंपनीने जनतेला भरमसाठ वाढीव बिले पाठवले. याचा फटका सर्वसामान्य जनतेसह शेतकऱ्यांना बसला असून अनेकांना वाढीव बिले आल्याने हे आवाच्या सव्वा बिले भरायची कशी अशा विवंचनेत ग्राहकवर्ग सापडला आहे.

ऊर्जा मंत्री मा.ना.श्री. नितीन राऊत यांनी १०० युनिट पर्यंत मोफत वीज देऊ अशी घोषणा केली होती व वाढीव विजबिले कमी करण्याचे आश्वासन दिले असतांना त्यावर कुठलीही कार्यवाही न करता सामान्य जनतेला भरमसाठ वीजबिले पाठवून ते भरण्याची सक्ती केली जात आहे.

ही वीज उपभोक्ता ग्राहकांची व शेतकऱ्यांची घोर फसवणूक असून सर्व सामान्य जनतेला त्वरित न्याय देवा अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेना तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देत आहे असे निवेदन निफाड तहसीलदार साहेब व निफाड पोलिस ठाणे यांना देण्यात आले.

यावेळी म.न.से तालुकाध्यक्ष शैलेश शेलार,विधानसभा अध्यक्ष शिवमूर्ती खडके,तालुका उपाध्यक्ष केशव काका वाघ,सरचिटणीस अब्दुल भाई शेख,संजय भाऊ मोरे,म.न.वी.से तालुकाध्यक्ष तुषार गांगुर्डे,विधानसभा अध्यक्ष सुयोग गायकवाड,मनसे पिंपळगाव शहर अध्यक्ष राजू भवर,म.न.वी.से शहर अध्यक्ष गिरीश कसबे,तालुका सरचिटणीस संग्राम दाभाडे,उपाध्यक्ष नीलेश सोनावणे प्रशांत हेमंत ढोमसे उपाध्यक्ष ऋषिकेश झांबरे, कोरडे, नीलेश सोनवणे, शुभम जाधव,आनंदा नागरे,विकास शेलार,बनकर,आदी सह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.