कोरपना येते पदवीधर मतदार संघाची आढावा बैठक संपन्न

31

✒️सय्यद शब्बीर जागीरदार(विशेष प्रतिनिधी)मो:-९६२३८९६५७४

कोरपना(दि.26नोव्हेंबर):-पदवीधर मतदार संघाची बैठक आज घेण्यात आली या बैठकीचे उद्घाटन माननीय प्रशांत जी आर्वे भाजपा जिल्हा उपाध्यक्ष यांच्या हस्ते करण्यात आले कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री नारायण हिवरकर भाजपा जिल्हा उपाध्यक्ष होते.

तर प्रमुख पाहुणे श्री पुरुषोत्तमजी भोंगळे तालुका उपाध्यक्ष,श्री कवडुजी जरीले,श्री किशोर बावणे,श्री संजयजी मुसळे,श्री प्राध्यापक वज्जलवार सर,श्री शशिकांत अडकिने, श्री विजय रणदिवे सरपंच, श्री अमोल आसेकर नगरसेवक,श्री जगदीश पिंपळकर,श्री प्रमोद पायघन,श्री अनिल कौरासे,श्री वासुदेव आवारी इतर मान्यवर उपस्थित होते पदवीधर मतदार संघ या विषयी सविस्तर आढावा घेण्यात आला.

प्रास्ताविकात श्री नारायण हिवरकर यांनी कोरपना तालुका पदवीधर मतदार यादीची संपूर्ण माहिती दिली श्री प्रशांतजी आर्वे सर यांनी संपूर्ण यादीचे वाचन करून आढावा घेतला व प्रत्येक मतदाराच्या घरी जाऊन भेटी गाठी घ्या व श्री संजय जी जोशी यांना प्रचंड बहुमताने निवडून आणा अशी विनंती केली कार्यक्रमाचे संचालन श्री पुरुषोत्तम भोंगळे यांनी केले तर आभार जगदीश पीपंळकर यांनी मानले बैठकीला भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.