गंगाबाई तलमले महाविद्यालय संविधान दिन साजरा

26

✒️रोशन मदनकर(उप संपादक)मो:-8888628986

ब्रह्मपुरी(दि.26नोव्हेंबर):-येथील स्थानिक गंगाबाई तलमले महाविद्यालयात संविधान दिन उत्साहात साजरा करण्यात आला. प्रा. कु. सुप्रिया ढोरे यांनी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला माल्यार्पण व पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. याप्रसंगी संविधान उद्देशपत्रिकेचे सामूहिक वाचन करण्यात आले.

त्यानंतर मनोगत व्यक्त करताना प्रा.कु. सुप्रिया ढोरे म्हणाल्या की, भारतीय संविधान स्वातंत्र्यलढ्यातील सहभागी सेनानीच्या स्वप्नातील भारत कसा असावा याचे प्रतिबिंब भारतीय संविधानात दिसते. भारतीय संविधान सर्वांगसुंदर आहे. प्रमुख अतिथी म्हणून बोलताना प्रा. जयगोपाल चोले म्हणाले की, व्यक्तीला स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय, मिळविण्याची शास्वती देणारे कल्पवृक्ष म्हणजे भारतीय संविधान आहे. अध्यक्षीय भाषणात प्राचार्य मंगेश देवढगले म्हणाले की, भारतीय संविधान उज्वल भविष्याचा पथदर्शक व प्रत्येक मानवाला माणूस म्हणून ओळख देणारा ओळखपत्र आहे.

या कार्यक्रमाला प्रा. कु. सुप्रिया ढोरे, प्राचार्य मंगेश टी. देवढगले, प्रा. जयगोपल चोले, प्रा. अनिल प्रधान, प्रलय खरकाटे, कनक ठोंबरे, गौरव गोवर्धन, निवृत्त श्रीरामे, विवेक काटलाम, विशाल श्रीरामे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन कनक ठोंबरे यांनी तर आभार प्रदर्शन प्रलय खरकाटे यांनी केले..