महिलांचा सन्मान आणि भारताचे संविधान

54

भारतीय संविधान हा राष्ट्रीय ग्रंथ आहे याचा विसर सुशिक्षित, सराकारी पदावर नोकरी करणाऱ्या आणि भारी पगार घेणाऱ्या लोकांना, महिलांना पडलेला आहे. आजही स्वतः ला उच्च शिक्षीत ल़ोक व महिला म्हणतात आम्ही भारताच्या संविधानाला मानतो. यातून त्यांची अक्कल आणि आणि संविधान व देश यांच्या बाबतची आपुलकी दिसून येते. पहिली गोष्ट मानतो म्हणजे नेमके कोणावर उपकार करतो? आणि दुसरी गोष्ट तु जर भारतीय असशील आणि भारतात राहायचे असेल तर संविधानाचा आदर करून अंमलबजावणी करावी लागेल. संविधान देशाचे सर्वोच्च असते. आणि देशाचे सर्वोच्च असलेले संविधानच जर समजले नसेल आणि त्याचे पालन होत नसेल तर भारतात राहण्याचा कोणताही अधिकार नाही.

डोक्याने मतीमंद असल्येले लोक आजही भारताच्या संविधानाला एकाच धर्माचा धर्म ग्रंथ मानतात. काही लोकांना संविधानाचे नाव घेतले तर मिरच्या लागतात, काही लोकांच्या डोक्यात संविधान म्हणजे विशीष्ट जातीला सवलती मिळण्याचे पुस्तक समजतात. थोडक्यात सुशिक्षित समजणाऱ्या भारत देशात आजही येथील नागरिक संविधानाच्या ज्ञाना पासून कोसो दुर ठेवल्या गेले. संविधानाचे महत्त्व, संविधान नेमके काय? संविधान नेमके कोणासाठी? या प्रश्नांची उत्तरे सुद्धां लोकांकडे आज नाही. उलट विशिष्ट समुहाला बोलताना आम्ही संविधान माणतो हे गर्वांने सांगण्याचा प्रयत्न करताना तो विसरून जातो आपण अजून संविधान बघितले नाही, बघितले पण वाचले नाही वाचले पण समजले नाही.

जातीची आणि द्वेषाची एवढी घाण डोक्यात आहे कि हे लोक संधिनालाच जातीत बंद करण्याचा मुर्खपणा करत आहेत. भारताचे संविधान भारतीय नागरिक यांच्या घरात आणि डोक्यात का गेले नाही याचा विचार केला संविधानची एकांगी मांडणी, संविधान निर्मात्याची जात ह्याच गोष्टी बघून स्वतः ला हाडामासाचे देशभक्त समजणाऱ्या लोकांनी सुद्धा संविधाना पासून दुर राहण्यात धन्यता मानली. भारतीय संस्कृती मध्ये प्रामाणिकता, ईमानदारपणा शिकवल्या जातो पण तो भारतीय संविधाना विषयी कोणाकडे दिसत नाही.

भारताच्या संविधानाने कोणाला काय दिले ह्याचा विचार करण्या अगोदर संविधाना पुर्वी कोणाला कोणकोणत्या गोष्टी नाकारल्या होत्या ? कोणी नाकारल्या होत्या आणि का नाकारल्या होत्या ?यावर मंथन केले तर समजेल संविधानाने काय दिले. तेव्हा कळेल संविधानाचे महत्त्व, तेव्हाच कळेल संविधानाचे गांभिर्य. संविधानाच्या पुर्विची सामाजिक, राजकीय, धार्मिक आणि शैक्षणिक परिस्थिती काय होती याचा विचार केला तर अंगावर काटा येऊन मन हेलावल्या शिवाय राहणार नाही. आणि त्यातही महिलांची परिस्थिती बघितली तर तिला फक्त आणि फक्त पशुतूल्य वागणूक होती.

बाई म्हणजे पायातील वहान अस समजून रांत्रदिवस महिलांचे शारीरिक, सामाजिक, राजकीय शैक्षणिक शोषण करून तिला फक्त चुल आणि मुल येथ पर्यंत च मर्यादित केले होते. महिला म्हणजे करमणुकीचे साधन नाही तर प्रगतीचे माध्यम आहे म्हणून स्रियांच्या मनाचा विचार करून पशुतूल्य जीवनातून मानवाच्या जिवणात आणण्याचे काम संविधानाने केले. जन्मतः प्रत्येकाला मन असते मन मनापासून मत व्यक्त करण्याचा अधिकार हा महिलांना नव्हता एक व्यक्ती म्हणून मानासन्माने वागण्याचा व निर्भीडपणे मत व्यक्त करण्याचा अधिकार हा संविधानाने दिला. स्त्रियांची गुलामी बाजूला सारून सलामी मिळावी म्हणून संविधान स्त्रियांच्या सोबत आहे. डोक्यावरचा पदर खाली पडला तर अपशकुन, पाप समजले जायचे आज डोक्यावरचा पदर जाऊन शासनाची जबाबदारी मिळते ही देण संविधानाचीच आहे.

बाईने चौकटीच्या बाहेर पाऊल टाकू नाही अशा पारंपारिक शिकवणीतून महिलांना गुलाम बनवून ठेवल्या जात होते. एका झटक्यात गुलामीच्या बेड्या तोडून आकाशात मुक्त संचार करून देशाचे प्रतिनिधित्व करण्याचा अधिकार हा संविधानानेच दिलेला आहे. भारताच्या संविधानाने महिलांना उत्तुंग झेप घेण्याचे बळ दिलेले आहे. परंतू प्रामाणिकतेचे धडे देणाऱ्या महिला संविधानासोबत प्रामाणिक दिसत नाहीत. काय बदल पडला महिलांच्या जिवनात संविधानाचा? तर आज महिला यांचे स्थान, मान सन्मान हे सर्व संविधानाची देण आहे. वर्ण, पंथ यावरून आजही समाजात भेद केला जातो, काळा वर्ण असला तर लग्न पण जुळत नाही मात्र संविधानाने दिलेल्या सुखसुविधा देतात कोणताही भेद केला जात नाही.

संविधानाप्रती महिलांनी जेवढे आदरपूर्वक व सन्मान पुर्वक वागायला पाहिजे होते तशाप्रकारे महिला वागताना दिसत नाही. संविधानापुर्वी आणि संविधाना नंतरची महिलांची परिस्थिती बघितली तर आज महिलांना सोन्याचे व प्रगतीचे दिवस आलेले आहेत. माणसा प्रमाणेच स्रि पुरुष भेद न करता स्रियांना विचार स्वातंत्र्य, आचार स्वातंत्र्य, शिकण्याचे स्वातंत्र्य, बोलण्याचे स्वातंत्र्य, मत मांडण्याचे स्वातंत्र्य, मत खोडण्याचे स्वातंत्र्य अशा सर्व प्रकारचे स्वातंत्र्य बहाल करून महिलांना मानसिक, शारीरिक व कायदेशीर दृष्टीने सक्षम बणवण्याचा प्रयत्न संविधानाने केलेला आहे. संविधानाच्या माध्यमातून शिकुन मोठ्या झालेल्या महिलेला जेव्हा कोणी प्रश्न विचारतो तेव्हा अपवाद वगळता महिला संविधानाचा उल्लेखच करत नाहीत. उलट याची कृपा त्याची कृपा दाखवून आपल्या यशाचे श्रेय काल्पनिक बाबींना देतात.

पायातील गुलामी बेडी तोडून मानसिक स्वातंत्र्य देऊन स्त्रियांना पुरुषांप्रमाणे फक्त संविधान वागवते. स्त्रियांमध्ये असलेल्या सुप्त गुणांना वाव देण्याची संधी फक्त संविधानाने निर्माण करून दिलेली आहे. संविधानाने सामाजिक क्रांती केलेली आहेच परंतु महिलां विषयी ऐतिहासिक क्रांती करून महिलांचे जिवन सुफलाम बनवण्याचे काम संविधानाने केलेले आहे याची जाणीवच आज महिलांना राहली नाही. बोलण्याचा अधिकार मिळाला पण अपवाद कधिच वगळता महिला संविधानावर बोलल्या नाही. लिहण्याचा अधिकार मिळाला पण महिलांनी संविधानावर लिहले नाही, मत व्यक्त करण्याचा अधिकार मिळाला पण संविधाना विषयी महिला मत व्यक्त करत नाहीत. ऐतिहासिक वारसा जपण्याचा अधिकार असताना महिलांच्या कपाटात लाखो रुपये किंमतीचे कपडे सापडतील, स्वतः च्या उंची पेक्षा मोठे टेडी सापडतील पण भारताचे संविधान सापडत नाही. ही शोकांतिका आहे. संविधानाने महिलांचे अस्थित्व व सन्मान निर्माण करून दिलेला आहे पण आपल्याला सन्मान मिळवून देताना कोणत्या अडचणी आल्या होत्या का याची काळजी त्यांना नाही.

महिलांनी स्वतः च्या सौदर्यावर खुप मोठा खर्च केला आहे पण ज्यामुळे आपले अस्थित्व निर्माण झाले आणि टिकून आहे त्या विषयी महिला अज्ञानी आहे. दरवर्षी अंधविश्वासाचे साहित्य वाचणाऱ्या महीलांनी अस्तित्वाचे संविधान वाचले नाही ही खंत आहे. राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवर चर्चा करण्याची चर्चेत सहभागी होण्याची संधी निर्माण झाल्याने अनेक विषयांवर महिलांनी चर्चा केल्या परंतु कोणत्याही महिलांनी संविधानाचा उल्लेख करून संविधानाने महिलांचा सन्मान वाढवून अस्तित्व निर्माण केले याविषयी बोलताना दिसल्या नाही. संविधान राष्ट्रीय संपती आहे याची जाणीवच महिलांना राहली नाही. आजही पुरुष प्रधान संस्कृती ची बेगड चढवलेले लोक स्त्रियांना घरात दुय्यम मानतात, घरात दुय्यम वागणूक असणाऱ्या महिला प्रशासनात प्रमथ पदावर काम करतात ही देण फक्त संविधानाची आहे. तरीही महिला संविधाना विषयी आपुलकी आदर न बाळगता संविधानावर दुर्लक्ष करतात.

तर एवढे शिकुन आणि सरकारी नोकरी करून काय फायदा? संविधानाचा प्रचार प्रसार करणाऱ्या लोकांनी सुद्धा संविधानाची योग्य मांडणी करून संविधानाने महिलांना काय दिले याबाबत जनजागृती करणे गरजेचे आहे. नोकरी करताना पुरुषांप्रमाणे पगार, मँटरनिटी लिव्ह, ही देण सुद्धा संविधानाची आहे. संविधानाचा लाभार्थी प्रत्येक जण आहे पण संविधानाची संविधानाची जाणीव असलेले लोक खुप कमी आहेत आणि विषेशतः महिला पिछाडीवर आहेत. दिवसभर टिव्हिवर अनैतिक मालिका बघण्यात मोठेपणा वाटत असलेल्या महिलांना संविधान वाचण्याची सवड मिळत नसेल तर त्या महिलांना काय म्हणावे. देशाच्या नावाने नारे देणारे लोक संविधान कधी वाचत नाहीत तरीही देशभक्त हे तर नवलच आहे. या संविधान दिनी महिलां पर्यंत भारताचे संविधान पोहचवण्याचा संकल्प करून आपण वर्षे भर काम केले तर आपण काही ना काही महिलांना परिवर्तनाच्या प्रवाहामध्ये आणु शकतो. महिलांचा मान सन्मान संविधान असल्याने जिवापेक्षा जास्त संविधानाचे पालन व्हायला पाहिजे होते पण तसे झाले नाही. म्हणून महिलांचा सन्मान भारताचे संविधान अशा मथळ्या खाली आपण संविधानाच प्रचार प्रसार केला तर खऱ्या अर्थाने संविधान दिन साजरा केल्याचे सार्थक होईल.
*************************************
✒️लेेेकख:-पंजाबराव सदावर्ते(रा.आरेगाव,ता. मेहकर)मो:-९१३०९७९३००