दिग्रस येथे ७१ वा संविधान दिन साजरा

29

🔹भारतीय बौद्ध महासभेचे आयोजन

✒️बाळासाहेब ढोले(पुसद प्रतिनिधी)मो:-7875157855

दिग्रस(दि.27नोव्हेंबर):-दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखा दिग्रस यांच्यावतीने ७१ वा संविधान दिन साजरा करण्याचे आयोजन डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन पडगिलवार लेआऊट येथे करण्यात आले होते.या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून तालुका शाखाध्यक्ष विनायक देवतळे हे होते.

तर प्रमुख पाहुणे म्हणून महादेव धुळध्वज, प्रदीप नगराळे, प्रा. मधुकर वाघमारे, चिंतामण मनवर हे उपस्थित होते.सर्वप्रथम या मान्यवरांच्या हस्ते तथागत गौतम बुद्ध व डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महामानवांच्या प्रतिमांचे पूजन करून सामूहिक त्रिशरण, पंचशील घेऊन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.

या कार्यक्रमाचे अध्यक्ष विनायक देवतळे यांनी संविधान दिन हस्तलीखीताचे प्रकाशन केले. सविधान दिनविशेष विषयी महादेव धुळध्वज सर, प्रदिप नगराळे सर, प्रा मधुकर वाघमारे, चिंतामण मनवर यांनी उद्बोधन केले. त्यात राज्यघटना तयार करण्याची कार्यवाही, मुलभूत हक्क, मार्गदर्शक तत्वे, मसूदा समितीतील डॉ.बाबासाहेबांचे कार्य यांची सविस्तर माहिती देण्यात आली.

यावेळी देविदास खंदारे, भिमराव नगराळे, यशवंत भरणे, त्रिपाल राहूलगडे, उत्तम इंगोले, अशोक कांबळे, नरेंद्र फुलझले, सुरेश वानखेडे, नंदू गुजर, उद्धव अंबुरे, रमेश वहीले, पुरुषोत्तम मेश्राम, सुभाष मोहोड, तुकाराम उबाळे, लता भरणे, सुनीता मनवर, पुष्पलता धुळध्वज, ज्योती वहीले , सावळेताई इत्यादी उपस्थित होते.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तुकाराम उबाळे यांनी केले. तर आभार एकनाथ मोगले यांनी मानले.या कार्यक्रमाची सांगता संविधानाची प्रास्ताविका वाचून व सरणतय गाथेने करण्यात आली.