चंद्रपूर जिल्ह्यात (दि.28नोव्हेंबर) रोजी 166 नव्याने कोरोना पॉझिटिव्ह – दोन कोरोना बधितांचा मृत्यू

29

✒️रोशन मदनकर(उप संपादक)मो:-8888628986

चंद्रपूर(दि.28नोव्हेंबर):- जिल्ह्यात मागील 24 तासात 109 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. तर 166 कोरोनाबाधीत रुग्णांची नव्याने भर पडली असून दोन कोरोनाबाधीताचा मृत्यू झाला आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 19 हजार 692 वर पोहोचली आहे. तसेच सुरुवाती पासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या 17 हजार 649 झाली आहे. सध्या एक हजार 748 बाधितांवर उपचार सुरू आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एक लाख 48 हजार 705 नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी एक लाख 25 हजार 354 नमुने निगेटीव्ह आले आहेत.

आज मृत झालेल्या बाधितामध्ये सावली येथील 51 वर्षीय पुरूष व आष्टी येथील 57 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 295 बाधितांचे मृत्यू झाले असून यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील 272, तेलंगणा एक, बुलडाणा एक, गडचिरोली 14, यवतमाळ पाच, भंडारा एक आणि वर्धा येथील एका बाधिताचा समावेश आहे.

नागरिकांनी बाहेर निघतांना नियमितपणे मास्कचा वापर करावा. वेळोवेळी हात स्वच्छ करणे तसेच सुरक्षित अंतराचे पालन करावे. कोरोना पासून सुरक्षित राहण्यासाठी प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.