क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांचे विचार आत्मसाद करा – माजी जि.प.अध्यक्ष भाग्यश्रीताई आत्राम

29

🔹नागेपल्लीत केले म.ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्याला अभिवादन

✒️राहुल डांगे(विशेष प्रतिनिधी)मो:-9850801314

अहेरी(दि.29नोव्हेंबर):- क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांनी रंजल्या गंजल्या समाजासाठी आणि मुख्यतः स्त्रियांच्या उन्नतीसाठी सर्वस्वी अर्पण केले असून क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांचे विचार प्रत्येकांनी आत्मसाद करावे असे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष भाग्यश्रीताई आत्राम यांनी केले.ते अहेरी नजीकच्या नागेपल्ली येथे शनिवार 28 नोव्हेंबर रोजी क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्य आपले विचार प्रकट करतांना बोलत होते.

यावेळी प्रामुख्याने नागेपल्ली ग्राम पंचायतीचे उपसरपंच मलरेड्डी येमनुरवार, कांचनलाल वासनिक, सामाजिक कार्यकर्ते सुरेंद्र अलोने, सविता गुरुनूले, हर्षाली दलाई, ज्योती ठाकरे, किशोर रापेल्लीवार आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी पुढे बोलतांना जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष भाग्यश्रीताई आत्राम यांनी, फुले होते म्हणून मुली घडले. त्यांच्या व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या शिकवणूक व प्रेरणेने महिला उत्तुंग व अक्षरशः आकाशात भरारी घेत आहेत. तसेच शेतकरी, कष्टकरी यांच्या हितासाठी फुले दांम्पत्य सर्वस्वी अर्पण केले असून या थोर महापुरुषांचे विचार आत्मसाद करून त्या दिशेने वाटचाल करावे असे म्हणत मोलाचे मार्गदर्शन यावेळी भाग्यश्रीताई आत्राम यांनी केले.

तत्पूर्वी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष भाग्यश्रीताई आत्राम यांनी, क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पुर्णाकृति पुतळ्या समोर अगरबत्ती व मेणबत्ती प्रज्वलित करून पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.यावेळी श्रीनिवास विरगोनवार, वसंत निकुडे, प्रेमदासजी गुरुनुले, मुकत्यार पठाण, धर्माजी गुरुनूले,चंद्रकला ठाकरे, हसन पठाण, सारंग सवरंगपती, श्रीनिवास कोटरंगे, आदी व प्रतिष्टीत नागरिक उपस्थित होते.