महाविरनगर पुसद येथे संविधान गौरव दिन साजरा

28

🔸भारतीय बौद्ध महासभा व पारमिता महिला मंडळ महाविरनगर यांचा पुढाकार

✒️बाळासाहेब ढोले(पुसद प्रतिनिधी)मो:-7875157855

पुसद(दि.29नोव्हेंबर):-दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखा पुसद व पारमिता महिला मंडळ महाविर नगर यांच्या संयुक्त विद्यमानाने ७१ वा संविधान गौरव दिन स्थानीय बुद्ध विहार महाविर नगर पुसद येथे साजरा करण्यात आला.या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी बौद्धाचार्य, प्रचार व पर्यटन जिल्हा सचिव भगवान बरडे हे होते.या कार्यक्रमास प्रमुख वक्ते म्हणून साहित्यिक कु.पूजा गडदे, यांची उपस्थिती होती कार्यक्रमाचे उद्घघाटक म्हणून आत्माराम धाबे प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास पुसद हे उपस्थित होते.

तर प्रमुख पाहुणे म्हणून ॲड .वाय. एम .जांभुळकर प्रज्ञापर्व अध्यक्ष २०२०, भोलानाथ कांबळे जि .प .सदस्य, देवेंद्रजी खडसे प .स.सदस्य, डॉ. एन .डब्ल्यू. पठाडे , विष्णू सरकटे, अरुण जाधव, तालुकाध्यक्ष माजी सैनिक भारत कांबळे, मिलिंद हट्टेकर, लक्ष्मण कांबळे अध्यक्ष रिपाई पुसद शहर, किशोरदादा कांबळे जिल्हाध्यक्ष भिम टायगर सेना, राजेश ढोले सचिव रिपाई पुसद शहर, दै.लोकमतचे पत्रकार समाधान केवटे उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला उपस्थित मान्यवरांच्या हस्ते तथागत गौतम बुद्ध व प.पू. डॉ.बाबासाहेब आंबेडकर या महामानवांच्या प्रतिमांचे पूजन करून सामुहिक त्रिशरण पंचशील घेऊन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक तुकाराम चौरे यांनी केले. त्यानंतर फुले, शाहू ,आंबेडकरी चळवळीतील सामाजिक कार्यकर्त्यांचा पुष्पगुच्छ, शाल ,सन्मानचिन्ह ,भगवान बुद्ध व त्यांचा धम्मग्रंथ, संविधानाची प्रास्ताविका देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला .

यामध्ये रमेश सरागे, पंजाबराव चव्हाण कवी साहित्यिक , मोहम्मद सनी, डॉ. प्रा. सागर साखरे, सय्यद सिद्दिकोदिन, वंदना ग्रुप पुसदची टिम, वंशिका विनोद कांबळे,

तसेच यावेळी कोविड योद्धा म्हणून लक्ष्मण कांबळे रिपाई अध्यक्ष पुसद शहर, किशोरदादा कांबळे भिम टायगर सेना जिल्हाध्यक्ष, राजेश ढोले रिपाई सचिव पुसद, गजानन जाधव अध्यक्ष माणुसकीची भिंत पुसद व सर्व टिम , हिम्मत राठोड, यांना पुष्पगुच्छ, शाल, कोविड योध्दा सन्मानपत्र, भगवान बुद्ध व त्यांचा धम्मग्रंथ ,संविधानाची प्रास्ताविका देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

यावेळी भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकेचे वाचन करण्यात आले.त्यानंतर रिपब्लिकन वार्ता साप्ताहिक वृत्तपत्राच्या दिवाळी अंकाचा प्रकाशन सोहळा जिल्हा प्रतिनिधी राजेश ढोले व तालुका प्रतिनिधी लक्ष्मण कांबळे यांच्या उपस्थितीमध्ये मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.

यावेळी आत्माराम धाबे म्हणाले की संविधानाचे सार्वत्रीक वाचन होणे ही काळाची गरज आहे. तसेच यावेळी कार्यक्रमाच्या प्रमुख वक्त्या म्हणून साहित्यिक पूजा गडदे यांनी सांगितले की डॉ. बाबासाहेब आंबेडकर २० जुलै १९४२ च्या भाषणात म्हणतात की कोणत्याही समाजाची किंवा देशाची प्रगती किती झाली ही त्या समाजाच्या किंवा देशातील स्त्रियांची प्रगती किती झाली.

यावरून त्या समाजाची किंवा त्या देशाची प्रगती मोजता येते असे डॉ.बाबासाहेब म्हणतात तसेच त्यांनी यावेळी हिंदू कोड बिलावर सविस्तरपणे प्रकाश टाकला.या कार्यक्रमासाठी भारतीय बौद्ध महासभा व पारमिता महिला मंडळ पदाधिकारी तसेच उपासक-उपासिका उपस्थित होते.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. जनार्दन गजभिये यांनी केले,तर आभार कविता रंगारी यांनी मानले.