‘उठा तुम्हीही जिंकणारच’ – अंधलाही डोळस बनविणारे पुस्तक

32

काल मुंबईहून नाशिकला आलो,वेळ फार कमी होता. पण माझ्या धमनीत गेली 2 वर्ष अशोक कुमावत सर यांच्या प्रेरणादायी लेखमालेबद्दल आकर्षण होते. आणि या लेखनातून मी माझ्या आयुष्यातील एक नवे सोनेरी पान लिहायला घेतले.ते म्हणजे काश्मीर ते कन्याकुमारी सायकल प्रवास.तसे पाहिले तर मी दोन्ही डोळ्यांनी अंध पण माझ्या मोबाईल अप्लिकेशन मुळे मी सरांचे लेख वाचू शकलो,त्यांच्या लेखांचे अनेक जाणकारांनी केलेले ऑडिओ सादरीकरण मी ऐकले.त्यातून जीवनाचा नवा मार्ग सापडला.माझ्या 21 वेळा कळसुबाई सारखे अवघड शिखर चढून जागतिक विश्वविक्रम करण्यात मला नक्कीच त्यांचे लेख सहाय्यभूत ठरले.यात शंकाच नाही.

आणि म्हणूनच मी वेळात वेळ काढून त्यांना पुस्तक पाहिजे असा फोन केला. लागलीच सरांनीही कुठलेही कारण न देता मला निमानी बसस्थानक या ठिकाणी *त्यांचे’उठा तुम्हीही जिंकणारच’ ही पुस्तके मला दिली.ती मित्रांसाठीही मी घेतली.आयुष्यात एक ज्ञानाचा अनमोल खजिना मिळाल्याचा आनंद मला झाला.या पुस्तकाचे वाचनातून अनेकांचे जीवन नक्कीच उजळून निघणार यात शंका नाही. त्यांचे हे पुस्तक परदेशात तर पोहचलेच परंतु महाराष्ट्राच्या घराघरात लवकरच पोहचेल याची मी अंध असूनही 1डोळसपणे खात्री नव्हे हमी देतो.सर आपल्या कार्यास परमेश्वर प्रचंड बळ देवो अशी प्रार्थना.

✒️लेखक:-सागर बोडके
(विश्वविक्रमवीर गिर्यारोहक)ह.मु.मुंबई
मो:-8975635325
पुस्तकासाठी
संपर्क:-9881856327