अपंग दिननिमित्त विविध कार्यक्रम

29

🔸वैद्यकीय तपासणी,साहित्य व स्वलंबन कार्ड चे वितरण

✒️माधव शिंदे(नांदेड, जिल्हा प्रतिनिधी)मो:-7757073260

नांदेड(दि.1डिसेंबर):-दरवर्षीप्रमाणे यावर्षी ही कार्यशाळा विराट दिव्यांग फाऊन्डेशन व साप्ताहिक दिव्यांग शक्ती च्या वतिने श्री मनोज नगर नाईक, रामेश्वर टेकाडे,डि टी ठाकरे,बेरोज्या सर यांचे प्रमुख ऊपस्थितीत गुरुवार दि. 03/12/2020 रोजी वेळ सकाळी १०:०० ते दुपारी ३:०० वाजेपर्यन्त आयोजित करण्यात आली आहे.

यावेळी अस्थिरोग तज्ञ श्री डाँ चेतनजी साटोटे समर्थ हाँस्पिटल सिव्हील लाईन व अस्थिरोग तज्ञ डाँ नितेशजी अग्रवाल अग्रवाल हाँस्पिटल जलंब नाका तर डाँ गुलाबराव पवार मधुमेह,रक्तदाब,ईतर दुर्धर आजारावर श्री सेवा हाँस्पिटल सत्कार लाॅज नांदुरा रोड , डाॅ जयंत सोनोने नाक, कान व घसा तज्ञ तुळजाई हाॅस्पिटल नांदुरा रोड, डाॅ ज्ञानेश टिकार जनरल फिजीशियन घाटपुरी नाका येथे मधुमेह,रक्तदाब,ईतर दुर्धर आजारावर हे आपल्या रुग्णालयातुन दिव्यांग बांधवांना दिव्यांग दिनाचे निमीत्याने मोफत आरोग्यसेवा प्रदान करतील तरी सर्व दिव्यांग बांधवांनी आपले अपंगप्रमाण पञाची प्रत घेऊन वरील कार्यक्रमाचा लाभ खामगाव शहर सह परिसरातील दिव्यांग बांधवांनी ध्यावा, (हे शिबीर फक्त अपंग दिनासाठीच मोफत आहे)

तसेच ज्या गरजवंत दिव्यांग बांधवला लागत असलेले साहित्य त्यांनी आपली नावे दिव्यांग शक्ती कार्यलय शाळा क्रं.6 आर्य समाज मंदिर जवळ दिनांक 03/12/2020 ते 09/12/2020 पर्यंत नोंद करावी.तर दि 09/12/2020 ला मोफत UDDID चे वितरण करण्यात येणार आहे तरी या सुविधेचा लाभ सर्व दिव्यांग बांधवांनी घ्यावा.असे आयोजकांच्यावतिने श्री मधुकर पाटिल, मोहमंद शकिल , अमोल भोलनकर लक्ष्मीबाई काटकर यांनी कळविले आहे.