जिल्हाध्यक्ष रोहित अहिवळेच्या कामगिरीमुळे सातारा जिल्हात दलित पँथरची गरुडझेप – महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष डाॅ.घनश्याम भोसले

27

✒️सातारा(पुरोगामी संदेश नेटवर्क)

सातारा(दि.2डिसेंबर):-अलीकडे काही महिने माध्यमांतून दलित अत्याचारांबद्दल सतत वाचनात, पाहण्यात येत होते. त्यामुळे मन विषण्ण होत होतं. पण सातारा जिल्हातील ग्रामीण भागातील हजोरो युवक दलित पँथरशी जोडले गेले आहेत त्यामुळे दलितावरील अन्याय अत्याचार रोहित अहिवळे यांच्या कामगिरीमुळे कमी होतील आणि तेच दलिताना न्याय देतील.सातारा जिल्हाध्यक्ष रोहित अहिवळे यांनी राष्ट्रीय अध्यक्षा मा.मलिका नामदेव ढसाळ तसेच राष्ट्रीय उपाध्यक्ष मा.बाळासाहेब पडवळ यांच्या मार्गदर्शनाखाली सातारा जिल्हात गाव तिथे शाखांची बांधनी जोरात सुरू केली आहे.

गेल्या वर्षापासून सातारा जिल्हाध्यक्ष रोहित अहिवळे यांनी सातारा जिल्हात गावो गावी दलित पँथरच्या शाखा निर्माण करून संघटना अधिक बळकट करण्यासाठी कबंर कसली आहे. यासोबतच दलितांवर होणार्या अत्याचारा विरोधात सातत्याने आंदोलन करून दलित समाजाला न्याय देण्यासाठी जिल्हाध्यक्ष रोहित अहिवळे नेहमी प्रयत्न करतात.

दलित पॅथरच्या शाखा आता गावो गावी पोहचत आहे. दलित पँथरचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष डॉ. घनःश्याम भोसले यांच्या उपस्थितीत कोळकी येथे दलित पॅथरच्या शाखेची स्थापना करण्यात आली. कोळकीच्या शाखा अध्यक्ष पदी संदिप मोरे, शाखा उपाध्यक्ष पदी राजपाल सरतापे, शाखा कार्याध्यक्ष आर्यन भट्टे यांची तर फलटण तालुका उपाध्यक्ष पदी फिरोजभाई मुलाणी फलटण शहर उपाध्यक्ष पदी सिध्दार्थ(बापू) सावंत, फलटण महिला उपाध्यक्ष पदी सुजाता मोरे यांची निवड करण्यात आली.

यावेळी दलित पँथर महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष महेश गायकवाड, विश्वास मोरे, कायदेशीर सल्लागार अॅड. मनोज जावळे, सातारा जिल्हाध्यक्ष रोहित अहिवळे, सातारा उपाध्यक्ष लक्ष्मण काकडे, सातारा जिल्हा कार्याध्यक्ष किरण बनसोडे, सातारा जिल्हा संपर्क प्रमुख विराज भोसले, सातारा जिल्हा संघटक अनिरुद्ध खरात, फलटण तालुका अध्यक्ष मंगेश आवळे, फलटण शहर अध्यक्ष अभिजीत काकडे, बारामती तालुका अध्यक्ष गौरव अहिवळे, बारामती तालुका कार्याध्यक्ष शंतनु साळवे, बारामती शहर अध्यक्ष शुभम गायकवाड तसेच दलित पँथरच्या कार्यकर्त्याची लक्षणीय उपस्थिती होती.

दलित पँथर च्या कोळकी शाखेच्या उद्घाटन प्रसंगी महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष डॉ. घनःश्याम भोसले यांनी सातारा जिल्हाध्यक्ष रोहित अहिवळे यांचे संघटनेचे काम खुपच कौतुकास्पद असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. आज दलित पँथर संपुर्ण राज्यात, जिल्हात तालुक्यात पोहचलेला आहे . प्रत्येक गावा गावात संघटनेची बांधणी जोरात चालू आहे.

चळवळीत काम करताना शिक्षणाकडे दुर्लक्ष करू नका शिका ,संघटित व्हा आणि मगच संघर्ष करा. हे जातीयवादी सरकार न्याय घटना बदलण्यासाठी कट कारस्थाने करत असुन संविधनाचे रक्षण करणे ही आपले नैतिक जबाबदारी आहे. प्राथमिक शिक्षणपासुन संविधान शिक्षण सक्तीचे करण्याची मागणी यावेळी दलित पॅथर चे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष डाॅ घनःशाम भोसले यांनी केली.