लग्न समारंभामध्ये मोबाईल फोटोग्राफरच्या त्रासामुळे फोटोग्राफरनी लढवली नामी शक्कल

30
✒️सचिन सरतापे,(प्रतिनिधी,म्हसवड,सातारा जिल्हा)मो:-9075686100

म्हसवड(दि.2डिसेंबर):-लग्न समारंभात आपल्याल्या मिळालेल्या ऑर्डर पूर्ण सुदंर पद्धतीने पूर्ण करण्यासाठी आणि पार्टीने आपल्यावर दाखविलेला विश्वास हा फोटोग्राफर साठी आत्मसन्मानाचा विषय असतो कोणत्याही परिस्थितीत हे काम आपण चांगल्या पद्धतीने पूर्ण करून द्यायचे हा आत्मविश्वास घेऊन फोटोग्राफर हा आपल्या लग्नाच्या कामावर भारी कॅमेरे,पोट्रा लाईट्स,5 d कॅमेरे व दोन चार मदतनीस असा लवाजमा घेऊन गेलेले असतो की आपले काम चांगले व्हावे सर्व इव्हेंट्स व्यवस्थित कव्हर करता यावेत पण आज कोणत्याही लग्न समारंभात गेले.

तर मोबाईल फोटोग्राफर च जास्त दिसतात ज्यांना फोटोग्राफितील काहीच समजत नाही तो पण आपला अँड्रॉइड मोबाईल घेऊन आहेच स्टेजवरती.यामुळे यांच्या डिस्टरब मुले फॉटोग्राफरना आपले कामच व्यवस्थित करता येत नाही या मोबाईल फोटोग्राफरमुळे होणाऱ्या त्रासाला कंटाळून एका फोटोग्राफरनी एका लग्न समारंभात नामी शक्कल लढवून स्टेजवर एक बेनरच लावून टाकला आणि अशा मोबाईल फोटोग्राफरना जणू काही चपराकच दिली.