चोरीच्या मोटरसायकली देणार-घेणाऱ्याला सोडता कामा नये

    42

    ?प्रो.आयपीएस अधिकाऱ्याने पकडल्या तब्बल चोरी झालेल्या सव्वीस गाड्या

    ?चोरी झालेल्या मोटारसायकली परत मिळणार, ह्या आशेने नागरिकही सुखावले

    ✒️संजय कोळी(दोंडाईचा प्रतिनिधी)मो:-9075716526

    दोंडाईचा(दि.3डिसेंबर):- जनताभिमुख तक्रारींची दखल घेत, दोंडाईचा पोलीस स्टेशनला लाभलेले प्रोबेशनरी एसपी. श्री पंकजजी कुमावत यांनी चोरी झालेली एक रामीच्या गाडीचे पेमेंट चोराने आँनलाईन मागवत,त्याला शिताफीने ताब्यात घेत,त्याची चौकशी करत, तब्बल चोरी झालेल्या सव्वीस गाड्या हस्तगत करत ,अनेक दिवसांपासून संगणमताने सुरु असलेल्या गाडी चोरीच्या गुन्ह्यांना आळा बसवत. अनेक लहान-मोठ्या सराईत-भुरट्या चोरांना ताब्यात घेत. गावात चोरीच्या गाड्या, वस्तु घेणाऱ्या-देणाऱ्यांमध्ये दहशत निर्माण करून टाकली आहे.

    म्हणून हाती आलेल्या गाडी चोरीच्या गुन्ह्यामध्ये देणाऱ्या-घेणाऱ्याला कोणत्याही परिस्थितीत मुबा न देता,व्हाईट काँलर व गावातील ब्लँक काँलर यांचा मुलाहिजा न बाळगता, सरळ गुन्ह्यात समावेश करत अद्दल घडवायला पाहिजे. म्हणजे भविष्यात कोणी कोणाची गाडी चोरणार नाही व विकत घ्यायची हिम्मंत करणार नाही, अशी आशा चोरी झालेली आपली गाडी हमखास नवीन लाभलेले प्रो.एसपी कडून सध्याच्या परिस्थितीत मिळेल,अशी आस गावातील स्वतः ची गाडी चोरी झालेले नागरिक पोलीस प्रशासनाकडे करत आहे.

    दोडांईचा शहरात चोरी व चोरी झालेली आपलीच वस्तू चोरांकडून अर्ध्या किमंतीत घ्यायचा विषय अनेक वर्षांपासून गंजलेला आहे व त्यापासून अनेक नागरिक आजतागायत त्रासलेले आहेत.पंरतु आजपर्यंत दोडांईचा पोलीस स्टेशनला लाभलेले एकही अधिकाऱ्याने तळापर्यंत जायची हिमंत केली नाही. म्हणून मागेही आम्ही आमच्या लेखात म्हटले होते की, येथे चोरी झालेल्या व्यक्तीला चोरीची तक्रार देण्यात जेवढे स्वारस्य वाटत नाही. तेवढेच तो चोर बाजारात, संबधित यत्रंणा व चोरापर्यंत पोहचत आपल्या वस्तूंची अर्धी किमंत ठरवत, वस्तू ताब्यात घ्यायची सवय झाली आहे.

    कारण अशा व्यवहाराने दोघा तिघांचे भागते.म्हणजे एकीकडे ज्याच्याकडे चोरी झाली. त्याला पोलीसात तक्रार देण्यापासून, घेण्यापासून जी तारेवरची कसरत करावी लागते. ती सामान्य माणसाचे डेली रूटीन खराब करत ,नाकेनऊ आणणारी असते आणि चोरीची तक्रार दाखल झाली तर पुढे तिचा फाँलप, पाठपुरावा घेत ,वेळ खाली वाया घालण्यापलीकडे हाती काही येत नाही. म्हणून हा त्रासलेला माणूस सरळ संबंधित चैनसाखळीतील लोकांना भेटत.आपलीच चोरी झालेली वस्तू अर्ध्या किमंतीत घेतो हे पोलीस यत्रंणासह गावातील नागरिकांना सर्वज्ञात आहे.

    म्हणून गावातील कोणकोणते व्यक्ती चोरी करतात व कोणकोणते एरिया हया व्यवहारासाठी फेमस आहेत व कोणती मंडळी मध्यस्थीची भुमिका बजावतात हे ज्ञात असुन पोलीसांमार्फत ते बाहेर येणे खुप गरजेचे आहे. मागे पंधरा वीस दिवसापुर्वी मानराज हाँटेल बोळीत, भाजीपाला मार्केटमध्ये माखीजा एजन्सीसमोर एकाने गाडी लावून भाजीपाला घ्यायला गेला.तेवढ्यात तेथे एक दुसरा माणूस येतो व ही गाडी माझी आहे. येथे कोणी लावली. ती घरून चोरीला गेली होती. मी रितसर दोंडाईचा पोलीस स्टेशनला तक्रार दिली आहे, असा गाजावाजा करत पुर्ण बाजार उचलून धरला.

    तेव्हा उपस्थित एजन्सी मालक, व भाजीपाला विक्रेत्यांने सरळ गाडी घेऊन पोलीस स्टेशनला जाणाच्या सल्ला दिला. त्यानंतर ती गाडी ज्याने तेथे लावली .तो भाजीपाला घेऊन तेथे आला व माझी येथे लावलेली गाडी कुठे गेली अशी विचारणा करू लागला. तेव्हा उपस्थितांनी सदर घटनाक्रम सागितला व तोही पोलीस स्टेशनला गेला. तेव्हा आम्ही पोलीस स्टेशनला संपर्क केला असता त्याने ती चोरीची गाडी अशाच एका मध्यस्थीच्या ब्रोकर कडून पैसे देवून घेतली होती. म्हणून गुन्हा दाखल न करता फक्त तक्रार अर्ज घेत ,चोरीची गाडी घेणाऱ्याला सोडून देण्यात आले. पोलिसांनी जर त्याचवेळेस तपास यंत्रणा लावली असती तर अशीच मोठी मोटरसायकलचोर साखळी हाती आली असती.

    तरी आता दोडांईचा पोलीस स्टेशनला लाभलेले प्रोबेशनरी एसपी श्री पंकजजी कुमावत यांनी रामी येथून चोरी झालेली गाडी ,चोरांनी आँनलाईन पैसे घेत सोडायची जी व्यवहार भाषा केली. तिची दखल घेत,गुन्हा दाखल करत , तपासाची चक्रे फिरवत,गाडी चोरून, चोरीच्या गाड्या देणार-घेणाऱ्यांमध्ये भिती निर्माण करत,आख्खा परिसर पिंजून एका गाडीवरून व एका हाती आलेल्या चोरावरून जवळजवळ चोरी झालेल्या तीस गाड्या हस्तगत करत अनेक लहान-मोठ्या ,सराईत-भुरट्या चोरांना ताब्यात घेत.

    गावात कायद्याचे चांगलेच वातावरण करून टाकले आहे. याबाबत लवकरच आज उद्या दोंडाईचा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. पण ह्या चोरीच्या गुन्ह्यात गाडी चोरी करणाऱ्या सोबत ,चोरीची गाडी घेणार-देणाऱ्याला तेवढीच शिक्षा व्हायला पाहिजे. त्यात गावातील कोणत्याही व्हाईट-बँल्क काँलरचा मुलाहिजा बाळगता कामा नये,अशी आस पोलीस प्रशासनाकडे व खासकरून दोंडाईचा पोलीस स्टेशनला लाभलेले प्रोबेशनरी एसपी श्री पंकजजी कुमावतकडे ज्यांची कष्टाची गाडी चोरीला गेली आहे व आजपर्यंत मिळून आली नाही असे लोक धरून आहेत.