ऑनलाईन कापूस विक्रीच्या नोंदी मध्ये सुधारणा करण्यात यावी

32

✒️अनिल साळवे(गंगाखेड प्रतिनिधी)मो:-8698566515

गंगाखेड(दि.3डिसेंबर):-कृषी उत्पन्न बाजार समिती येथे ऑनलाइन कापूस विक्री च्या नोंदी मध्ये सुधारणा करणेबाबत श्री.तायडे साहेब प्रशासक यांची भेट घेवून त्यांना निवेदन देण्यात आले.

काल पासून परभणी जिल्ह्यात शासनमार्फत ऑनलाईन कापूस विक्री नोंद सुरू झाली आहे परंतु शेतकऱ्यांनी नोंद केल्यानंतर क्रमांक द्यावा तो दिला जात नाही शेतकऱ्यांना मराठी SMS च्या माध्यमातून कळवण्यात यावे तसेच पालम तालुक्यातील शेतकरी बांधवाना त्याच्या करिता मरडसगांव येथील जिनिंग राखीव ठेवण्यात यावी.

त्यामुळे शेतकरी बांधवणा यांचा मोठा फायदा होईल व त्यांचा वाहतूक खर्च कमी होईल असे लेखी निवेदन श्री.तायडे साहेब प्रशासक कृषी उत्पन्न बाजार समिती गंगाखेड व सचिव श्री.गायकवाड यांच्याकडे आज देण्यात आले आहे.

यावेळी उपस्थित रामप्रभु मुंढे भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य महाराष्ट्र, रंगनाथ सोळंके प्रदेश सचिव किसान मोर्चा, कृष्णा सोळंके तालुका अध्यक्ष भाजपा, शिवराज काका गुट्टे आदी उपस्थित होते..!