भारतीय सैन्यातील सेवा निव्रत्त मेजर नंदकुमार धोंडीबा कळसे यांचा हणेगाव येथे भव्य सत्कार

47

✒️महादेव उप्पे(देलगुर प्रतिनिधी)मो:-९४०४६४२४१७

हणेगाव(दि.3डिसेंबर):-येथील भूमीपुत्र नंदकुमार धोंडीबा कळसे यांची भारतीय सैन्यातील सेवा दि.०१/११/२०२० रोजी सेवानिव्रत्त झाल्यामुळे हणेगाव येथे नवयुवक संघटनेच्या वतीने भव्य सत्कार करण्यात आला.

यावेळी या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ष.प्र.भ्र.१०८ शंकरलिंग शिवाचार्य महाराज हिरेमठ संस्थान हणेगाव तर या कार्यक्रमाचे सत्कारमुर्ती म्हणून मेजर नंदकुमार कळसे हे होते.यावेळी प्रमुख पाहूणे म्हणून अशोक पटणे,बस्वराज भाये,महादेव पटणे सर,बस्वराज मठपती सर,संदीप चेलवे सर यावेळी या सगळ्यांनी देशसेवेबद्दल अभिमान,त्याग,बलिदान या विषयावर मार्गदर्शन केले यानंतर मेजर नंदकुमार कळसे यांनी सांगितले कि देशातील सैन्यदलातील सेवेत जो मान सन्मान व गौरव मिळतो तो इतर कोणत्याच सेवेत मिळत नाही.

खरे तर घराघरातील तरूण सैन्यदलात भरती होऊन देशाची सेवा करावी.देशाची सेवा करण्यासाठी भाग्य लागतो.ते आमच्या भाग्यात होते.असे ते बोलून दाखविले.देशाचे राष्ट्रपती,पंतप्रधान वर्षातुन दोनदा तरी सैन्याला सलामी देतात तर मी माझ्या जीवनात किशोर वयापासून ते वयाच्या ५२ व्या वयापर्यंत देशाची सेवा केली.मला देशाबद्दल खूप अभिमान आहे.यामुळे संधी मिळालीच तर संधीचे सोने करा व सैन्यदलात भारती व्हा असे आव्हान हणेगावचे सुपुत्र इंडियन आर्मीचे सेवा निव्रत मेजर नंदकुमार कळसे यांनी सत्काराप्रसंगी उपस्थित तरूणांना मार्गदर्शन केले.

नंदकुमार कळसे हे दि.०१/११/२०२० रोजी सेवा निव्रत झाल्यामुळे हणेगाव येथील नवयुवक संघटनेच्या वतीने हा आर्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.मेजर नंदकुमार कळसे यांची निवड १९८८ साली इंडियन आर्मीमध्ये झाल्यानंतर ते ३३ वर्ष २ महिने देशसेवा केली.या कालावधीत ते भारत देशातील २२ राज्यात चांगली कामगिरी करून दाखविली व इंडियन आर्मीची मान उंचावली व इंडियन आर्मीची कमिशन परीक्षा पास होऊन “अशोक स्तंभ “पुरस्कार प्राप्त केले व सैन्यदलात ते एक हजार सैन्याचे ते मेजर झाले.

यावेळी या कार्यक्रमाचे अध्यक्ष अप्पाजी महाराजांनी पण नवयुवक तरुनांना योग्य मार्गदर्शन केले.यावेळी नवयुवक संघटनेचे पदाधिकारी अभिषेक उप्पे,अमित अच्यारे,युवराज स्वंतकर,नागेश घुळे,रवि जोशी व पत्रकार उमाकांत पंचगल्ले,किशोरजी आडेकर,प्रशांत माळगे,महादेव उप्पे व रविद्र ज्यांते,रविद्र वंटगीरे,लच्छिराम धडगे व गावातील प्रतिष्ठित नागरीक उपस्थित होते.या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन व आभारप्रदर्शन उमाकांत पंचगाल्ले यांनी केले.