गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेसाठी शेतकऱ्यांना लाभ घेण्याचे आवाहन

27

✒️माधव शिंदे(नांदेड,जील्हा प्रतिनिधी)मो:-7757073260

नांदेड(दि.3डिसेंबर):- शेती व्यवसाय करताना होणारे अपघात, वीज पडणे, पूर, सर्पदंश, विजेचा शॉक बसणे, इत्यादी नैसर्गिक आपत्तीमुळे होणारे अपघात, रस्त्यावरील अपघात वाहन अपघात, अन्य कोणत्याही कारणामुळे होणारे अपघात, त्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांचा मृत्यू ओढावतो किंवा काहीना अंपगत्व येते . घरातील करत्या व्यक्तीस झालेल्या अपघातामुळे कुटुंबास उत्पन्नाचे साधन बंद होऊन अडचणीची परिस्थिती निर्माण होते.

अशा अपघातग्रस्त शेतकऱ्यास त्यांच्या कुटुंबास आर्थिक लाभ देण्याकरीता वहितीधारक खातेदार शेतकरी व वहितीधारक खातेदार नोंद नसलेले शेतकऱ्यांच्या कुटूंबातील कोणतेही एक सदस्य यामध्ये आई , वडील, शेतकऱ्यांचे पती / पत्नी, मुलगा व अविवाहीत यापैकी कोणतेही एक व्यक्ती असे 10 ते 75 वर्ष वयोगटातील एकुन दोन जनाकरीता गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना राबविण्यास शासनाने मान्यता दिली आहे.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी तालुका कृषि अधिकारी कार्यालयाशी संपर्क करावा, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी आर. बी. चलवदे यांनी केले आहे.विम्यापासुन मिळणारे आर्थीक लाभ अपघाती मृत्यु रु. 2 लाख, अपघातामुळे दोन डोळे अथवा दोन अवयव निकामी होणे रु. 2 लाख, अपघातामुळे एक डोळा व एक अवयव निकामी होणे रु. 2 लाख, अपघातामुळे एक डोळा अथवा एक अवयव निकामी होणे रु. 1 लाख असे विम्यापासून आर्थिक लाभ मिळणार.

विमा संरक्षणासाठी समाविष्ठ असलेले अपघात रस्ता, रेल्वे अपघात, उंचावरून पडून मृत्यू, पाण्यात बुडून मृत्यू , नक्षवाद्यांकडुन होणाऱ्या हत्या , अपघाती विषबाधा, जनावरांच्या हल्ल्यांमुळे किंवा चावल्यामुळे होणारे अपघाती मृत्यु , विजेचा धक्का, विज पडून मृत्यू सर्पदंश, विंचु दंश खुन, दंगल इत्यादीमुळे होणाऱ्या अपघाती घटनांमुळे शेतकऱ्यास मृत्यू किंवा अपंगत्व आल्यास विम्याव्दारे आर्थिक लाभ मिळु शकतो.

दावा करण्यास लागणारे कागदपत्रे तालुका कृषि अधिकारी यांचे दिनांकासहीत पत्र (मुळ प्रत), संपुर्ण दावा अर्ज वारसदाराच्या मोबाईल नंबरसहीत सहित भरलेला, वारसदाराचे नॅशनलाईज बॅक खाते पुस्तक (झेरॉक्स) (जनधनचे नको), घोषणापत्र अ व ब (अर्जदाराच्या फोटो सहित) वयाचा दाखला (मतदान कार्ड/पॅन कार्ड/ वाहन परवाना/ जन्माचा दाखला/ पासपोर्ट / शाळेचा दाखला ) साक्षांकित केलेली झेरॉक्स प्रत जोडावी. सातबारा 6 क, 6 ड फेरफार मुळ प्रत मृत्यू प्रमाणपत्र (मुळ प्रत) (एफआयआर) प्रथम माहिती अहवाल, अकस्मात मृत्युची खबर घटनास्थळ पंचनामा इन्क्वेष्ट पंचनामा (मरणोत्तर पंचनामा) पोस्टमॉर्टम रिपोर्ट (शवविच्छेदन अहवाल )वाहन चालविण्याचा वैध परवाना व्हिसेरा रिपोर्ट अपंगत्वाचा दाखला व फोटो, दोषरोप पत्र ,औषध उपचाराचे कागदपत्रे, अपघात नोंदणी 45 दिवासाचे आत करावे .

वहितीदार नोंद नसलेल्या व्यक्तीस दावा करण्यास लागणारी कागदपत्रे ज्या शेतकऱ्याच्या वहिती खातेधारक म्हणून नोंद आहे. त्याचा वारस म्हणुन प्रस्ताव सादर करतो आहे. त्या शेतकऱ्याच्या सातबारा उतारा, 6 ड (जुना फेरकार), अपघाता संबंधी सर्व लागणारी कागदपत्रे जशीच्या तशी शिधापत्रिका (राशनकार्ड) वहितीधारक खातेदार शेतकऱ्याशी नाते स्पष्ट करणारी कागदपत्रे (पुरावा).

योजनेचा लाभ घेण्यासाठी संबंधित जिल्हा, तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे संपर्क करा. विमा कंपनी युनिव्हर्सल सोम्पो जनरल इन्शुरन्स कं. ली. विभागीय कार्यालय: ऑफिस नं. 2020 दुसरा मजला, विनर्स कोर्ट झेड के वरती, लुल्ला नगर, सहाने सुजान पार्क, पुणे-411040 संर्पक- 020 26832667/ 41212222 Website : www. universalsompo.com. विमा सल्लागार जयका इंश्युरन्स ब्रोकरेज प्रा.लि. रजि.ऑफिस : 2 रा मजला, जयका बिल्डींग कमर्शियल रोड, सिव्हिल लाईन्स, नागपुर-440001 या योजनेचा लाभ घेण्यासाठी तालुका कृषि अधिकारी कार्यालयाशी संपर्क करावा.