महापरिनिर्वाण दिनानिमित्त विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना गोळेगाव गावकऱ्यांच्या वतीने अभिवादन

35

✒️देवराज कोळे(गेवराई प्रतिनिधी)मो:-8432409595

गेवराई(दि.6डिसेंबर):/महापरिनिर्वाण दिनानिमित्त विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना गोळेगाव गावकऱ्यांच्या यांच्या वतीने रविवारी अभिवादन करण्यात आले.

गोळेगाव चे सरपंच सिद्धेश्वर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली गोळेगाव येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या चौकामध्ये महापरिनिर्वाण दिनानिमित्त रविवार, दिनांक 6 डिसेंबर रोजी पुष्पहार अर्पण करून महामानवाला विनम्र अभिवादन करण्यात आले.

या प्रसंगी सरपंच सिद्धेश्वर काळे माजी उपसरपंच भाऊसाहेब महाराज काळे माजी ग्रामपंचायत सदस्य जितेंद्र खरात संतोष काळे मारुती काळे राम कोरडे नंदकुमार मेढे भीमराव खरात सुदाम काळे सुधाकर कांबळे अशोक उबाळे आदी उपस्थित होते