फुले, शाहू, आंबेडकरांचे विचारच देशाला तारणार

36

🔸सामाजिक कार्यकर्ते सुरेंद्र अलोने यांचे प्रतिपादन

✒️राहुल डांगे(विशेष प्रतिनिधी)मो:-9850801314

अहेरी(दि.8डिसेंबर):- क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले, आरक्षणाचे जनक राजश्री शाहू महाराज, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे अर्थात फुले, शाहू, आंबेडकरांचे विचारच या देशाला तारणार असल्याचे प्रतिपादन ज्ञान प्रसारक नवयुवक मंडळाचे सचिव सुरेंद्र अलोने यांनी केले.ते स्थानिक बौद्ध विहाराच्या प्रांगणात ज्ञान प्रसारक नवयुवक मंडळाने आयोजित ६ डिसेंबर भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६४ व्या महापरिनिर्वाण दिनी बोलत होते.

यावेळी अध्यक्षस्थानी मंडळाचे अध्यक्ष एकनाथ चांदेकर होते. तर उदघाटक म्हणून शोभाताई खोब्रागडे होते. प्रमुख अतिथी म्हणून दामोधर राऊत, प्रशांत भीमटे, महेश अलोने, संदीप सुखदेवे, माणिक ओंडरे, सुधाकर करमे आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी पुढे बोलतांना सामाजिक कार्यकर्ते सुरेंद्र अलोने म्हणाले की, मोठ्या संघर्षातुन डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला संविधान बहाल करून कायापालट केले, केवळ शिक्षण व लेखणीच्या भरवश्यावर तक्ता पलटिविले असल्याचे म्हणत फुले, शाहू, आंबेडकरांचे विचारच या देशाला तारणार असल्याचे म्हणाले.

यावेळी दामोधर राऊत, प्रशांत भीमटे, शोभाताई खोब्रागडे आदींनी आपले विचार प्रकट केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार राहुल गर्गम यांनी मानले. कार्यक्रमात समाज बांधव उपस्थित होते.