शेतकरी आंदोलनाला शिक्षक भारती व राष्ट्र सेवा दलाने दिला पाठिंबा

34

✒️चिमूर(पुरोगामी संदेश नेटवर्क)

चिमूर(दि.8डिसेंबर):-केंद्र शासनाने लागू केलेले तिन्ही कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीसाठी पुकारलेल्या बंदला देशातील,राज्यातील अनेक शेतकरी,सामाजिक संघटनांनी पाठींबा दिला आहे. शेतकऱ्यांच्या ८ डिसेंबरला पुकारलेल्या भारत बंदला राष्ट्र सेवा दल,शिक्षक भारती यांनी पाठींबा दिला आहे.

चिमूर जि.चंद्रपूर येथे शिक्षक भारतीचे विभागीय उपाध्यक्ष रविंद्र उरकुडे,राष्ट्र सेवा दल मंडळ सदस्य व शिक्षक भारती विभागीय सचिव सुरेश डांगे,राष्ट्र सेवा दलाचे मनोज राऊत,सुरेश मेश्राम यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ एकत्र येत या कायद्यांचा निषेध केला व हे तिन्ही कायदे रद्द करण्याची मागणी केली.