जलयुक्त शिवार घोटाळा प्रकरणात व्ही. एम. मिसाळ व बी. बी. बांगर कृषी खात्यामार्फत निलंबीत करण्याचे दिले आदेश

    35

    ?वसंत मुंडे यांनी दिली माहिती

    ✒️अतुल बडे(विशेष प्रतिनिधी)मो:-9096040405

    मुंबई(दि.8डिसेंबर):-महाराष्ट्र परळी विधानसभा मतदारसंघातील जलयुक्त शिवार घोटाळ्यांमध्ये कृषी खात्यांमधील 32 अधिकारी निलंबीत व 167 ते गुतेदारावर,मजुर संस्थेच्या व एफआयआर दाखल करण्याचे आदेश शासनामार्फत देण्यात आलेले आहेत अशी माहिती काँग्रेसचे नेते वसंत मुंडे चेअरमन श्रम व रोजगार मंत्रालय भारत सरकार नाशिका विभाग यानी दिली आहे मूळ अर्ज शासनाकडे दि 18/ 8/ 2016 देऊन चौकशी संदर्भात कारवाई केली त्यामध्ये 883 कामापैकी 307 कामे तपासणी त्यात 8कोटीचा भ्रष्टाचार उघडकीस आला व 26 अधिकारी निलंबीत करून 138 गुतेदारावर मजूर संस्था वर एफ आय आर दाखल करण्याचे आदेश शासनाकडून देण्यात आले.

    उच्च न्यायालय सर्वोच्च न्यायालय लोकायुक्त कार्यालयात मार्फत प्रकरण न्यायप्रविष्ट होत गेले त्यात तक्रार वसंत मुंडे अखेर प्रत्येक बाबीचा पाठपुराव्यामुळे यश प्राप्त झाले नंतर राहिलेली कामे तपासण्या संदर्भात वसंत मुंडे यांनी शासनाकडे पाठपुरावा करून 6 अधिकारी निलंबनाची 25 गुत्तेदार मजुरसंस्था 41 लाख रुपये वसूल करण्यासंदर्भात आदेश कारवाई करून गुन्हे दाखल करण्यासंदर्भात आदेश देण्यात आले आहेत तरीही स्थानिक व जिल्ह्यातील राजकीय हस्तक्षेपामुळे
    गुन्हे दाखल करण्यास विलंब करण्यात आला.

    असा आरोप काँग्रेसचे नेते वसंत मुंडे केला आहे सतत पाठपुरावा केल्यामुळे लाचलुचपत विभाग आर्थिक गुन्हे विभाग विधानमंडळातील प्रश्न उत्तर महालेखा विभागामार्फत ऑडिट ची मागणी केली त्यावर शासनाने दखल घेऊन एसटीची समिती नेमण्यात आली व दिनांक आज दि 4/12/2020 ला बी बी बांगर तालुका कृषी अधिकारी परळी वैजनाथ सध्या शिरूर कार्यरत असलेले तसेच मिसाळ व्ही एम उपविभागीय कृषी अधिकारी अंबेजोगाई सध्या बीड यांच्यावर कृषी विभाग महाराष्ट्र शासनाकडून क्रमांक:वि चौ प्र 1020/ प्र क्र 64/5अ कृषी विभागाकडून दि 4 डिसेंबर 2020 ला कार्यसन अधिकारी लांडगे अ. ज्ञा यांनी निलंबनाचे आदेश कृषी आयुक्त कार्यालय पुणे यांना देण्यात आले आहेत.

    अशी माहिती काँग्रेस नेते वसंत मुंडे यांनी पत्रकारांना दिली अखेर जलयुक्त शिवारा घोटाळा मध्ये 32 अधिकारी 167 ते मजूर संस्था गुत्तेदार त्यांच्यावर कारवाई वसुलीची निलंबनाचे एफ आय आर दाखल करण्याची झालेली ची माहिती काँग्रेसने वसंत मुंडे यांनी पत्रकारांना दिली आहे काही कालावधीतच रमेश भताने विभागीय सहसंचालक सेवानिवृत्त यांच्यावरही शासनाच्या नियमानुसार कारवाई करण्यास पाठपुरावा करणार असे वसंत मुंडे यांनी पत्रकारांना माहिती दिली