जीवनात शेवटी पर्याय नसतो,आत्मसमर्पण हाच पर्याय !

28

आज पर्यन्त आपण सर्व काही बघत आलेलो आहे. सुख , दु;ख , अनेक संकट . यातील एक भाग मी आपल्या समोर मांडतोय.
नक्की आत्मसमर्पन म्हणजे काय? तर आपण आपल्या जीवनाला एखांद्या वेगळ्या वळणावर विलिन करणे म्हणजे आत्मसमर्पन होय!आपल्या कानावर दररोज नवनविन घटना पडतात . त्यातिल एक उदाहरणे म्हणजे “आत्महत्या”, हा शब्द आपल्या कानावर पडतो तेव्हा आपण विचार करतो असे नव्हते पाहिजे करायला . आत्महत्या करण्याचा छंद जनू आज काल प्रत्येक घराघरात वाढत आहे. जसे की मुलाला मोबाईल नाही दिला तर मुलाने आत्महत्या केली , प्रियकराली प्रेयसीने नकार दिल्यामुळे प्रियकराने ट्रेन पटरीवर जीव दिला , सासु सासऱ्याला वैतागुन विवाहित महिलेने गळफास घेऊन आत्महत्या केली.

असे अनेक घटना रोज वाचायला-बघायला मिळतात. पण कधी आपण विचार करत नाही , की त्या आत्महत्येच्या मागे काय कारण असु शकते.. आपण काही वेळा आपल्याकडूनचं विचार का करतो? कधी आत्महत्या करणाऱ्यांच्या बाजुने का विचार करत नाही? आज काल प्रत्येकाला सवय लागलेली आहे ती काही तरी मिळवण्याची , जेव्हा सर्व प्रयत्न करुन काही मिळत नसेल तर शेवटचा पर्याय असतो मृतूच्या जवळ जाऊन आत्मसमर्पन करणे.

बऱ्याचं वेळा असे होते की ज्या गोष्टी घडायला नको असतात तरी अचानक त्या घडतात. नंत्तर त्या गोष्टीचा आपल्याला पच्छाताप होतो , पण पच्छाताप होण्याआधीच आपण त्या गोष्टी थांबवल्या तर? कोणीचं आत्महत्या करनार नाही असे मला वाटते. हल्ली जास्त हत्महत्येचा कल प्रेमयुवक व युवतींकडे वाढले आहे. दोघाचं लग्न होनार नाही किंवा घरचे परवांगी देनार नाहीत म्हणून पळून जातात. एका दृष्टीने पळून जाणे केव्हाही योग्य आहे .कारण दोघांचाही जीव जानार नाही. घरच्यांच काय मुलगा किंवा मुलगी आयुष्यातून कायमची जानार पण ते दोघेही नेहमी आनंदी असनार , नसले तरी परस्थिती त्यांना शिकवेल. हिचं गोष्ट जेव्हा मुलगा किंवा मुलगी आपल्या घरी सर्व सांगते की बाबा मी एका मुलावर प्रेम करत आहे.

हे सांगण्याचं कारण असे की घराचं आई-वडिलांवर स्वत:पेक्षाही जास्त विश्वास असतो की आपले लग्न त्या मुलाबरोबर लाऊन देतील. पण इथे वेगळचं घडतं..घरात मुलीवर बळजबरी केल्या जाते , मार दिल्या जाते , किंवा तिच्या मनाच्या विरूध्द लग्न करुन दिल्या जाते. पण समजाऊन सांगीतल्या जात नाही. तेव्हा मुला-मुलीच्या मनात प्रश्न येतात की आपल्या आता घरचे जगू देनार नाहीत म्हणून आपण मृतूशी आत्मसमर्पण करायला हवे . आणि तसेच घडते देखील परंतू , काही प्रश्न असे असतात की आपण मान ,मर्यादा , प्रतिष्ठा हे कमावलेलं सर्व मातीत जाईल या भितीने दोघांच्याही आयुष्याची राख रांगोळी करुन ठेवतो.
हे विचार बदलायला हवे. तरचं नवयुकांमध्ये आत्मसमर्पण करायचे प्रमाण कमी होऊ शकते.

दुसरी बाजू अशी की आपण दिवस रात्र झिंजतो पण आपल्या हातात काहीचं यश येत नाही तेव्ही मन खचुन जाते. करुन करुन कीती करावे आणि कोणासाठी करावे. जगणं नकोस वाट्टे तेव्हा पर्याय असतो आत्महत्याचं.ह्या सर्व गोष्टी अचानकचं घडत नाही तर याला जवाबदार आपणचं असतो आपण तसे घडण्यात त्यांना सुरवात पासुन मदत करत असतो. या गोष्टी थांबल्या पाहिजे असे वाटत असेल तर प्रत्येकाने प्रत्येकाशी मनमोकळा संवाद साधायली हवे. गरज सर्वाना असते अश्या गरजु लोकांची मदत करायला हवे. पोकळ आश्वासने भरपुर झाली काही तरी करुन दाखवायला हवे. तेव्हाच खरी माणूसकी माणसात कायम राहील. तुम्हाला आम्हाला पच्छाताप राहनार नाहू तर गर्व राहील की नाही मी कोणाचे तरी आयुष्य सुंदर बनवले.

माझ्या प्रिय मित्रानों, येवढचं सांगतो की कोणालाही आत्मसमर्पण करण्यास भाग पाडू नका , प्रत्येकाच्या मनात काय चाल्लेलं असतं हे आपण ओळखू शकत नाही म्हणून त्याला विश्वास द्या की तुम्ही त्यांच्या करिता काही इच्छिता. बघा जमतय का ? वेळ सर्वांवर येते हि वेळ आपल्यावर येऊ नये आपल्या घरात येऊ नये म्हणून आत्ताच सतर्क रहा. व सर्वाशी माणूस होऊन जगा.”आपल्याला काय करायचं मरू द्या तिकडे असे करु नका” असे म्हणू नका प्रसंग सांगून येत नाही. कदाचीत उद्याचा दिवस आपल्यावर खुप मोठे संकट घेऊन येत असेल कुणास ठाऊक ? त्या आधीच आपण आपल्या परीवारात , मित्र मंडळी , शेजारी , नातेवाईक …यांच्याशी मनाचा संवाद साधून त्यांना मदत करा!

“एक पाऊल समज घडवण्याकडे”

✒️लेखक:-विशाल पाटील वेरुळकर
मो:-९३०७८२९५४२