खामगाव येथे भारत बंदला उत्तम प्रतिसाद

32

✒️खामगाव(पुरोगामी संदेश नेटवर्क)

खामगाव(दि.8डिसेंबर):-शेतकरी आंन्दोलनाला पाठिंबा दाखवत भाजप वगळता सर्व पक्षियांचेवतिने खामगाव येथे शतप्रतिक्षत आपली प्रतिष्ठानाने बंद ठेऊन या भारत बंदला पाठिंबा दर्शविला.काॅग्रेसचे माजी आमदार राणा दिलीप कुमार सानंदा यांनी संपुर्ण शहरात मोटर सायकल रॅली काढुन या बंद मध्ये सहभाग नोंदविलातर ऊपविभागिय कार्यलय येथे भारिप बहुजन आघाडी जिल्हाध्यक्ष गणेशभाऊ चौकसे ,शरद वसतकार,युवक काॅग्रेसनेते तेजेंद्रसिंग चव्हाण,शिवसेनेचे संजय अवताळे,सुरेश वावगे,राष्टवादीचे भरत लाहुडकार,धोंडीराम खंडारे,शेकापभारतीय कामुनीस्ट पक्षाचे काॅम्रेड सि.एन.देशमुख,डाॅ विपल्व कविश्वर,जितेंद्र चोपडे,शेतकरी नेते कैलास फाटे,बहुजन महासंघ चे अॅड, भगत,सावरकर, आदींनी शेतकरी विरोधी असलेल्या व दिल्ली येथे शेतकरी आंन्दोलनाला पाठिंबा दर्शवित केंद्र सरकार विरोधी धोषणा करत, ऊपविभागिय अधिकारी यांना निवेदन सादर केले या आंन्दोलनाची दखल घेत व्यापारी सर्व सामान्य नागरिक यांनी शांततेत भारत बंदला पाठिंबा दिला.