घरकुलाचे अनुदान घेऊन बांधकाम नसल्यास फौजदारी कारवाई होणार – राहूल रेखावार

34

✒️नवनाथ आडे(गेवराई,तालुका प्रतिनिधी)मो:-9075913114/9404223100

बीड(दि.9डिसेंबर):- जिल्ह्यातील लाभार्थ्यांनी घरकुलाचे अनुदान घेऊन देखील बांधकाम पूर्ण केले नसल्यास कारवाई होणार असल्याचे संकेत जिल्हाधिकारी राहूल रेखावार यांनी बुधवारी दिले आहेत. बीड जिल्ह्यातील आवास योजनांचा आढावा घेतला. याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी कुंभार, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक दादासाहेब वानखेडे आदींची उपस्थिती होती.

पुढे रेखावार म्हणाले, जिल्ह्यातील आवास योजनेच्या आभार अनुदान घेऊन देखील घरकुलाचे बांधकाम केलेले नसल्यास त्यांच्यावर गुन्हे दाखल करून सदर अनुदान वसुलीची कारवाई केली जाईल.

आवास योजनामध्ये घरकुल मंजूर झाल्यानंतर लाभार्थ्यांना त्याचे बांधकाम करण्यासाठी शासकीय अनुदान वितरित करण्यात आले आहेत. या घरकुलांचे बांधकाम 12 महिन्यांच्या आतमध्ये पूर्ण होणे अभिप्रेत असून तसे न करता अनेक लाभार्थी फक्त अनुदान घेत असल्याने जिल्ह्यातील योजनेचा उद्दिष्ट साध्य होत नाही. अशा लाभार्थ्यांवर कारवाई होणे गरजेचे आहे, असे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार यांनी नमूद केले.