केंद्राचे शेतकरीविरोधी काळे कायदे रद्द करण्याच्या मागणीसाठी महाविकास आघाडीच्या वतीने निवेदन

29

✒️विजय तोकला(सिरोंचा प्रतिनिधी)मो:-9403477377

सिरोंचा(दि.9डिसेंबर):- केंद्र सरकारच्या अन्याय कारक कृषी कायद्यांच्या विरोधात दिल्ली सीमेवर सुरू असलेल्या आंदोलनाला पाठींबा देण्यासाठी व केंद्र सरकारच्या अन्यायकारक कृषी विधेयकांचा निषेध करण्यासाठी सिरोंचा तहसील कार्यालय येथे महाविकास आघाडी (राष्ट्रवादी काँग्रेस, कांग्रेस, शिवसेना) पक्षांच्या वतीने निषेध करण्यात आले व सन्मानीय सिरोंचा तालुक्याचे श्री तहसीलदार साहेब यांच्या मार्फत निवेदन महामहिम देशाचे राष्ट्रपती महोदय याना पाठविण्यात आले.

केंद्र सरकारने शेतकऱ्यांवर लादलेल्या नवीन कृषी कायद्यांच्या निषेधार्थ काल पुकारण्यात आलेल्या भारत बंदला अहेरी विधानसभा मतदारसंघात नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे.

यावेळी (महाविकास आघाडी) तालुक्याचे प्रभारी *राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष श्री मधुकर कोल्लूरी,कांग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष श्री रहीमभाई शेख, शिवसेना तालुका अध्यक्ष श्री दुर्गेश तोकला,राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका उपाध्यक्ष तथा समाजसेवक श्री सलाम सत्तार, रा.का.तालुका सचिव एम डी शानु, श्री नरेश संगर्थी, श्री कुम्मरी सडवली, श्री शंकर मंचारला, श्री नुकूम गट्टू, श्री कमलाकर पोयम (रा.का.), (कांग्रेस)(शिवसेना)सर्व सेलचे अध्यक्ष, पदाधिकारी, कार्यकर्ते व शेतकरी उपस्थित होते.