गंगाखेडच्या संत जनाबाई मंदिर परिसरासह गोदाकाठाचा कायापालट होणार

    38

    ?आ. डॉ. रत्नाकर गुट्टे यांची माहीती

    ✒️अनिल साळवे(गंगाखेड प्रतिनिधी)मो:-8698566515

    गंगाखेड(दि.10डिसेंबर):-गंगाखेड शहरातील संत जनाबाई मंदीर परिसर आणि गोदाकाठाचा संपुर्ण कायापालट केला जाणार आहे. यासाठीची संपुर्ण योजना तयार असून पहिल्या टप्प्यातील नीधीही ऊपलब्ध झाला असल्याची माहिती आ. डॉ. रत्नाकर गुट्टे यांनी दिली आहे. दरम्यान, आज आ. गुट्टे यांनी मंदिर परिसर व गोदा घाटाची प्रत्यक्ष पाहणी करत या कामांचा आढावा घेतला. यावेळी त्यांच्या समवेत कॉंग्रेस तालुकाध्यक्ष गोविंद यादव, नगराध्यक्ष विजयकुमार तापडिया व प्रशासकीय अधिकाऱ्यांची ऊपस्थिती होती.

    गंगाखेड शहरातील मोठा मारोती मंदिर ते पाण्याच्या टाकीपर्यंतचा भाग व संपुर्ण गोदाघाट परिसराचा पुर्ण विकास केला जाणार आहे. यासाठीची संपूर्ण योजना तयार असून शासनाच्या निधीचा पहीला टप्पा उपलब्ध झाला असल्याची माहिती गंगाखेडचे आमदार डॉक्टर गुट्टे यांनी दिली आहे. उर्वरित निधीसाठीचा प्रस्ताव शासनाकडे लवकरच सादर केला जाणार आहे. या भागातील सर्व मंदीरांचे सुसूत्रीकरण, भव्य भक्त निवास, गार्डन, लेझर वा संगीत शो, शॉपींग मॉल आदिंचा या विकास योजनेत समावेश असणार आहे. यासाठी नांदेड, पुणे, मुंबई येथील सल्लागार अभियंत्यांकडून प्रस्ताव मागवण्यात आले आहेत. यासंदर्भाने आज सर्व संबंधीतांची एक महत्वपूर्ण बैठक शासकीय विश्रामगृहात संपन्न झाली.

    या अनुषंगाने आज आमदार गुट्टे यांनी या संपुर्ण परिसराची पाहणी केली. नगराध्यक्ष विजयकुमार तापडीया, कॉंग्रेस तालुकाध्यक्ष गोविंद यादव, नगरसेवक सत्यपाल साळवे, राधाकृष्ण शिंदे, संत जनाबाई मंदीर समितीचे अजीव सदस्य शिवाजी चौधरी, भगवती मंदीर समितीचे अभिजीत पुरणाळे, बालाजी पुरणाळे, खंडोबा मंदीर समितीचे भुमरे मामा, संत नरहरी महाराज मंदीर समितीचे सचीन दहीवाळ, रंगनाथराव भोसले, सार्वजनिक बांधकाम विभागाचे ऊपअभियंता केदार सोनवणे, कनिष्ठ अभियंता बी. डी. राठोड, नगर परिषद मुख्याधीकारी पंकज पाटील, अभियंता वाघमारे, प्रकल्प सल्लागार अभियंता नागेश पैठणकर, नागनाथ कापुसकरी व ईतर प्रशासकीय अधिकारी यावेळी ऊपस्थित होते.

    ही योजना गंगाखेड शहराचा संपुर्ण चेहरा मोहरा बदलणारी असल्याचे सांगून यासाठी आवश्यक तो नीधी लवकरात लवकर ऊपलब्ध करून घेतला जाईल, असा विश्वास यावेळी बोलताना आ. गुट्टे यांनी व्यक्त केला. या विकासकामांकडे सर्वांनी राजकीय दृष्टीकोनातून न बघता सहकार्य करण्याचे आवाहन त्यानी केले. विकासकामांसाठी नगर परिषद आमदारांच्या खांद्याला खांदा लावून काम करणार असणार असल्याची ग्वाही नगराध्यक्ष विजयकुमार तापडीया यांनी दिली. तर मंदीर परिसर व गोदाकाठाच्या विकासासाठी आपण आमदार गुट्टे यांचे सोबत असल्याचे यावेळी कॉंग्रेस तालुकाध्यक्ष गोविंद यादव यांनी स्पष्ट केले.