जिल्ह्यातील कारखानदारांनी एफआरपी नुसार भाव न दिल्यास आंदोलन छेडणार – दत्ता वाकसे

30

✒️अंगद दराडे(बीड,जिल्हा प्रतिनिधी)मो:-8668682620

बीड(दि.10डिसेंबर):-बीड जिल्ह्यामध्ये दर वर्षी खूप मोठ्या प्रमाणात उसाचे उत्पादन होत असून बीड जिल्ह्यातील साखर कारखानदारांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे उसाचा योग्य भाव ना दिल्यास तीव्र आंदोलन छेडणार असा इशारा धनगर समाज संघर्ष समिती बीड जिल्हाप्रमुख दत्ता वाकसे यांनी दिला आहे , शेतकरी राजा हा रात्रंदिवस काबाडकष्ट करून शेतातील उसाचे उत्पन्न घेतो परंतु वेळोवेळी साखर कारखानदार कडून खूप मोठ्या प्रमाणात वेठीस धरले जात आहे.

परंतु यापुढे कारखानदारांनी एफ आर पी नुसार भाव न दिल्यास लोकशाही मार्गाने साखर कारखान्यासमोर हजारो शेतकऱ्यांना सोबत घेऊन तिव्र आंदोलन करणार आहे .त्याचबरोबर परिस्थिती पाहिली तर पश्चिम महाराष्ट्रातील कारखानदारांना 3450, रुपये भाव द्यायला परवडतो परंतु बीड जिल्ह्यातील कारखानदारांना का? परवडत नाही वेळोवेळी शेतकर्‍याच्या टाळूवरचं लोणी खाण्याचा काम कारखानदार करत आहेत त्यामुळे आता यापुढे शेतकऱ्यावरील अन्याय सहन केला जाणार नाही त्यामुळे बीड जिल्ह्यातील कारखानादारांनी एफ आरपी नुसार भाव दयावा अन्यथा कारखाण्या समोर तिव्र आंदोलन करणार आहे असे देखील दिलेल्या प्रसिद्धीपत्रकाव्दारे वाकसे यांनी म्हटले आहे.

‘ ‘ पश्चिम महाराष्ट्रातील कारखानदारांना 3450रूपये भाव दयाला परवडतो पण बीड जिल्ह्यातील का?नाही
तसं पाहिलं तर पश्चिम महाराष्ट्रातील कारखानदार आहे शेतकऱ्यांना 3450,रूपये भाव देतात परंतु मराठवाडा आणि बीड जिल्ह्यातील साखर कारखानदाराकडू शेतकरी बांधवांची मुसकट दाबी केली जात आहे परंतु यापुढे कारखानदारांच्या विरोधात लोकशाही मार्गाने आंदोलन करून एफ आर पी नुसार भाव देण्यास भाग पाडणार आहे असे देखील वाकसे यांनी सांगितले आहे.