अतुल खुपसे-पाटील यांचा ऊस दर व एक रक्कमी एफ.आर.पी. संदर्भात टेभूर्णी येथे रास्ता रोको

56

✒️नागेश खूपसे(सोलापूर प्रतिनिधी)मो:-7775096293

सोलापूर(दि.11डिसेंबर):-ऊस कारखाने चालु होवुन २ महिने झाले आहेत. पण कोणत्याही कारखान्याने दर जाहीर केला नाही की एफ आर पी दिला नाही ा मदमस्त कारखानदारांच्या विरोधात आवाज उठवण्यासाठी आज दि. ११ रोजी श्री. अतुल खुपसे- पाटील यांनी टेभूर्णी-कुर्डूवाडी रोडवरील उड्डाण पुलाखाली रास्ता रोको आंदोलन केले.

या आंदोलनात शेकडो शेतकरी सहभागी झाले होते. यावेळेस श्री.अतुल खुपसे पाटील म्हणाले की १७ तारखेपर्यंत कारखानदारांनी जर या आंदोलनाची दखल घेऊन ऊस दर जाहीर करावा अन्यथा १८ तारखेला तीव्र स्वरुपाचे आंदोलन करण्यात येईल असा इशारा कारखानदारांना दिला. यावेळी श्री. संजय बाबा कोकाटे, सुधीर बापु महाडीक, दिपक काका खुपसे- पाटील उपस्थित होते.