बहुआयामी बहुजन नेतृत्व – शरदचंद्रजी पवार

28

शरदचंद्रजी पवार हे फक्त नाव नाही तर एक विचार आहे, बहुजन समाजाचा आधार आहे, नवीन नेतृत्व घडविणारा गुरु म्हणजे शरदचंद्रजी पवार होत. शरदचंद्रजी पवार हे बहुजन समाजातील खंबीर आणि यशस्वी नेतृत्व म्हणून उदयास आलेले आहे. कॉलेज च्या जनरल सेक्रेटरी ते केंद्रीय कृषीमंत्री व्हाया महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हा प्रवास राजकीय लोकांना प्रोत्साहित करणारा तर आहेच परंतु वैचारिक दृष्टीने अभ्यास करण्या लायक सुद्धां आहे. शंभरटक्के राजकारण करून वरिष्ठांची हुजरेगिरी करून खुर्ची मिळविता येते हे अनेक राजकीय लोकांनी सिद्ध करून दिलेले आहे.

परंतु बहुजन समाजात जाऊन समाजकारण कारण राजकारण आपला स्वतः चा ठसा उमटवून बहूजन समाजातील सक्षम तरूणांना, सक्षम नेतृत्वाला आपल्या सोबत घेऊन जाऊन बहुजन समाजात शक्ती निर्माण करण्याचे काम शरदचंद्रजी पवार यांनी केले. शरदचंद्रजी पवार हे वैचारिक राजकारणी असल्याने बहुजन समाजाचे एक प्रेरणास्थान आणि आधारस्तंभ म्हणून उभे असतात. देशामध्ये काही विकृती जातीय दंगली घडविण्याचे षडयंत्र काही मनोविकृत संघटना करत असतात. परंतु ते षडयंत्र वैचारिक आणि राजकीय पातळीवर हानुन पाडण्याचे काम शरदचंद्रजी पवार अगदी सहजपणे करत असतात.

वैचारिक आणि बहुजन समाजाचे समाजकारण करून राजकारण करणे हे अत्यंत कठीण असलेली गोष्ट असली तरी शरदचंद्रजी पवार समाजकारण आणि राजकारण ह्या दोन्ही गोष्टी समांतर हाताळून बुद्धीजीवी वर्गाला प्रोत्साहन व राजकीय लोकांना धक्का देण्याचे काम ते करत असतात. शरदचंद्रजी पवार या व्यक्ती कडून प्रत्येकाला शिकण्यासाठी भरपूर काही आहे. फक्त शिकण्याची व शरदचंद्रजी पवार यांना समजून घेण्याची तयारी असली पाहिजे. शरद पवार फक्त पक्षाला, महाराष्ट्राला भावलेले व्यक्तीमत्व नसुन देशातील राजकारणाला भावलेले आदरनीय नेतृत्व म्हणजे पवार साहेब होत.

शरदचंद्रजी पवार यांचा सामाजिक आणि राजकीय असा दोन्हीही प्रवास मानसाच्या जिवनात उर्जा भरणारा आहे. हिंदु मुस्लिम दंगली वर नियंत्रण मिळवून दंगली मागचे कर्ते आणि करविते कोण आहेत यावर धारधार वार चालविण्याची क्षमता फक्त शरदचंद्रजी पवार यांच्या कडेच आहे. आपण शरदचंद्रजी पवार यांचा वेगवेगळ्या माध्यमातून जरी विचार केला तरी शरदचंद्रजी पवार हे आपल्याला यशस्वी व्यक्तीमत्व म्हणुनच दिसतात. राजकारण करताना समाजकारणावर थोडेही दुर्लक्ष न करणारा नेता म्हणजे शरदचंद्रजी पवार होत. आपण एक एक बाजु बघितली तर शरदचंद्रजी पवार यांचे कर्तृत्व आपल्या समोर दिसते.

भारताच्या राजकारणात पुरोगामी विचाराचे एकमेव नेतृत्व म्हणजे शरदचंद्रजी पवार आहेत. पवार यांच्या फक्त बोलण्यात पुरोगामीत्व नाही तर कर्मातही पुरोगामीत्व आहे. शरदचंद्रजी पवार धार्मिक नाही तर सामाजिक जिवन जगत असतात. अनेक उदाहरणाच्या माध्यमातून शरदचंद्रजी पवार यांच्या कार्याचा आढावा आपल्याला घेता येतो. आज बहुजन समाजातील लोकांना वाचण्यासाठी महात्मा फुलेंचे समग्र वाड़्मय आहे ते तयार करून प्रकाशित करण्यामध्ये शरदचंद्रजी पवार यांचा सिंहाचा वाटा आहे. महात्मा फुले यांचे विचार तर डोक्यात आहेतच पण ते पुस्तक रुपाने जतन करून पुरोगामी विचाराची पेरणी बहुजन समाजात होण्याच्या उद्देशाने पुस्तक रुपी महात्मा फुले समग्र वाड़्मय घरा घरात पोहचलण्याचा प्रयत्न करून समाजाला वैचारिक व पुरोगामी बनविण्यासाठी शरदचंद्रजी पवार यांनी खुप मोठी मेहनत घेऊन.

महात्मा फुलेंचे विचार शासन दरबारी ठेवणारा एकमेव नेता म्हणजे शरदचंद्रजी पवार होत. शरदचंद्रजी पवार यांच्या प्रयत्नामुळेच आज आपण महत्मा फुलेंचे वास्तववादी साहित्य वाचु शकत आहोत. बहुजन समाजातील हुरहुन्नरी व सक्षम तरुणांना वेगवेगळ्या क्षेत्रात नाव लौकिक करण्याची संधी शरदचंद्रजी पवार यांनी निर्माण करून दिलेली आहे. शिक्षण, साहित्य, कला, क्रिडा या बाबीवर सुद्धा शरदचंद्रजी पवार आपली पकड निर्माण करून त्यामध्ये यशस्वी व्यक्ती घडविण्याचे काम करत आहेत. फक्त राजकारणाचाच विचार केला तर सध्याचे राजकारण म्हणजे घराणेशाही आणि भांडवलशाही होय. एकाच घरातील लोकांना राजकारणात सक्रिय करून घ्यायचे आणि त्यांचा पैसा राजकीय निधी च्या नावाखाली हडपण्याचा प्रयत्न करणारे अनेक नेते आहेत.

परंतु ज्यांच्या कडे फक्त गुण आहे पैसा आणि राजकारण या दोन्ही गोष्टी नसलेल्या लोकांना आमदार करण्याचे धाडस फक्त शरदचंद्रजी पवार यांचीच केलेले आहे. साहित्य कला क्षेत्रातील धार धार बोलणारे आणि व्यवस्थेविरुद्ध दमदार लिहणारे फक्त शरदचंद्रजी पवार यांच्या छत्रछायेखालीच आमदार दिसतात. शरदचंद्रजी पवार यांचे आमदार सुद्धा पुरोगामी विचारांने पेटलेले असुन निर्भीड आणि परखड बोलुन पुरोगामी असल्याचा प्रत्येक ठिकाणी प्रत्यय आणुन देतात. स्पष्ट आणि निर्भीड बोलणाऱ्या लिहणाऱ्या लोकांचा राजाश्रय म्हणजे शरदचंद्रजी पवार होत. ज्यांना ग्रामपंचायत ची निवडणूक लढविण्याची ईच्छा नव्ही अशा किती तरी सक्षम नेतृत्वाला विधानसभेमध्ये निवडून आणुन बसविले. विधान परिषदेमध्ये सुद्धा वैचारिक, अभ्यासु व पुरोगामी विचाराचे लोक देऊन समाजकारणातुन यशस्वी राजकारण करणारे नेते ठरले आहेत.

शरदचंद्रजी पवार या नेत्याकडे बघितलं तर खरोखरच मेंदुला चालना मिळून देश एकसंघ ठेवून धर्मनिरपेक्ष सोबतच पुरोगामी विचाराची किती गरज आहे. आणि हातात सत्ता असल्यावर आपण धर्मनिरपेक्ष काम करून मजबुत पायाभरणी कशी करू शकतो याचे उदाहरण म्हणजे फक्त साहेबच.. क्रिडा, मिडिया, या क्षेत्रामध्ये सुद्धा शरदचंद्रजी पवार यांनी आपला धर्मनिरपेक्ष पणा दाखवून यश खेचून आणले आहे. क्रिकेटवर दरवर्षी करोडो रुपये खर्च करून क्रिकेट मधून देशाला कधिच काही समाधान कारक मिळाले नाही. परंतु शरदचंद्रजी पवार यांनी क्रिकेट मध्ये सुद्धां जात धर्म न बघता गुणवत्ता बघुन खेळाडूची नियुक्ती केली आणि ऐतिहासिक विजय मिळवला तो म्हणजे विश्वकप होय. खेळाडूंची क्षमता ओळखून त्यांना संधी दिली त्यामध्ये जात धर्म कुठेच बघितला नाही क्षमतेच्या आधार निवड केल्याने त्याचे फळ कपाच्या रुपात मिळते हीच तर कामाची पावती असते. शरदचंद्रजी पवार यांची नेमकी सामाजिक बाजु मांडावी की राजकीय बाजु मांडावी हा प्रश्नच पडतो.

कारण दोनही बाजु तितक्याच महत्वाच्या असुन नेतृत्वाची जाणीव करून देणाऱ्या आहेत. शरदचंद्र पवार यांच्या विषयी अजून एक विशेष माहिती म्हणजे शरदचंद्रजी पवार हे कुशल राजकारणी आहेतच याची संपूर्ण भारताला जाणीव आहे. कोणता पत्ता कुठे आणि कसा टाकायचा याची राजकीय जाणीव असलेला सध्या तरी एकच नेता ते नाव म्हणजे शरदचंद्रजी पवार होत. कोणत्या हिरोला झिरो करायचे आणि कोणत्या झिरोला हिरो करायचे हे कौशल्य असल्याने आजपर्यंत अनेक झिरोंना हिरो बनवून समाजामध्ये आदराचे स्थान निर्माण करून दिले आहे. आणि कितीतरी हिरोला झिरो करून अहंकार आला म्हणून घरी बसवले. यातून शरदचंद्रजी पवार हे कुशल राजकारणी म्हणून सर्व परिचित आहेत। राजकारण करताना कपटीपणाचे कधीच राजकारण करत नाही म्हणून तर कॉग्रेस मधुन बाहेर पडल्यावर स्वतः चा पक्ष तयार करून सुद्धा प्रत्येक पक्षाशी मैत्रीचे संबध प्रस्थापित करून सत्याचा स्विकार करून आजही राजकीय व सामाजिक दबदबा कायम ठेवणारा जाणता नेता म्हणजे शरदचंद्रजी पवार होत.

देशातील धर्मांध लोकांवर वचक ठेऊन धर्मनिरपेक्षतेचे धडे सर्वांना देणारे, स्वतः च्या पक्षात पुरोगामी विचाराचे स्पष्ट बोलणारे, लिहणारे वक्ते, लेखक यांना आमदार बनवून समाजात आजही पुरोगामी विचाराचे प्रबोधन घडवून आणून लोकांना वैचारिक दृष्टीने परिपक्व करून. बहुजन समाजातील गुणवत्ता ओळखुन त्यांना वाव देणारे आणि क्षेत्र कोणतेही असो त्या क्षेत्रामध्ये बहुजन समाजातील लहान लोकांना मोठे करून एक स्थान निर्माण करून देणारे नेते म्हणजे शरदचंद्रजी पवार होत. देशातील राजकारण शरदचंद्रजी पवार यांच्या नावाशिवाय पुर्ण होऊ शकत नाही तसेच देशातील पुरोगामी विचाराचा जाणता माणूस म्हणून म्हणून सुद्धां शरदचंद्रजी पवार यांचे खुप मोठे नाव आहे. तळागाळातील लोकांना घडविण्यासाठी स्वतः झिजणारे नेतृत्व म्हणजे शरदचंद्रजी पवार होत. नवीन चेहऱ्यांना संधी देऊन घराणेशाही चा विचार न करता गुणशाहीचा विचार करून गुणवत्तेनुसार त्या पदावर बसवून सामाजिक जबाबदारी देणारा नेता म्हणून शरदचंद्रजी पवार यांच्या कडे बघितले जाते.

शरदचंद्रजी पवार यांच्या विषयी कोणत्याही बाजूने बघीतलं तरी एक आदर्श नेता गुण असलेले व्यक्तीमत्व दिसते. म्हणून प्रस्थापित पक्ष आणि नेते यांना वगळून लोकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे शरदचंद्रजी पवार एकमेव लोकनेता आहेत. म्हणून तर बहुजन समाजातील लोकांच्या आशिर्वादाने शरदचंद्रजी पवार यांनी आज राजकारण, समिजकारणासह आपल्या वयाची ऐंशी वर्षे पुर्ण केली. त्यांना शतायुष्य लाभो सदिच्छा व्यक्त करून शरदचंद्रजी पवार साहेब यांना वाढदिवसाच्या मंगलमय, निरोगी आणि यशस्वी जीवनाच्या सदिच्छा..

✒️लेखक:-विनोद पंजाबराव सदावर्ते
रा. आरेगाव ता. मेहकर
मोबा: ९१३०९७९३००
*************************************