नांदगाव तालुक्यातील महाराष्ट्राचा आणखी एक सुपुत्र मेजर सुरेश घुगे यांना जम्मू-काश्मीरमध्ये वीरमरण

38

✒️विजय केदारे(विशेष प्रतिनिधी)मो:-9403277887

मनमाड(नाशिक)(दि.12डिसेंबर):- जम्मू काश्मीरच्या नवसेरा सेक्टर मध्ये कर्तव्य बजावत असताना डोंगरावरून पाय घसरून मनमाडच्या अस्तगाव येथील जवान सुरेश घुगे यांना वीरमरण आले आहे. रात्री ९ वाजेच्या सुमारास ही घटना घडली असून त्यांच्या निधनाने वृत्त येताच मनमाडसह नांदगाव तालुक्यात शोककळा पसरली.

घुगे 2006 साली मिल्ट्रीत दाखल झाल्यानंतर मराठा ई बटालियन मध्ये कार्यरत होते. काल रात्री डोंगरावर गस्त घालत असतांना पाय घसरून घुगे खाली पडून गंभीर जखमी झाले होते. त्यांच्यावर मिल्ट्री हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असतांना त्यांचे निधन झाले.त्यांच्या पश्चात आई,वडील,पत्नी आणि 9 वर्षाची मुलगी असा परिवार आहे.