ब्रम्हपुरी न्यायालयात राष्ट्रीय लोक अदालत संपन्न

32

✒️रोशन मदनकर(उप संपादक)मो:-8888628986

ब्रम्हपुरी(दि.13डिसेंबर):- मा.महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकर,उच्च न्यायालय,मुंबई यांचे आदेशान्वये तसेच जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांच्या निर्देशान्वये दिवाणी व फौजदारी न्यायालय,ब्रम्हपुरी येथे दिनांक १२/१२/२०२० रोज शनिवारला राष्ट्रीय लोक अदालतचे आयोजन करण्यात आले.ज्यात मोटार वाहन कायदा अंतर्गत ५,मुंबई पोलीस कायदा अंतर्गत १ तसेच भारतीय दंड संहिता अंतर्गत २६ असे एकूण ३२ प्रकरणात १०,२०० रुपये दंड वसुल करण्यात आला.त्याचबरोबर न्यायालयात दाखल पुर्व अश्या एकूण १० प्रकरणातुन २१,९५,४२९ दंड वसुल करण्यात आला.

सोबतच एका दिवाणी स्वरूपाच्या प्रकरणातुन ५६,००० रुपये वसुल करण्यात आले.असे एकूण १५ प्रकरणे लोक अदालत मध्ये समजौता करण्यात आले.यावेळी लोक अदालतचे पॅनल प्रमुख म्हणून मा.गो.मोरे साहेब दिवाणी न्यायाधीश (क.स्तर) तथा न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग,ब्रम्हपुरी तर पॅनल सदस्य म्हणून अधिवक्ता.अंकिता गिरडकर व अधिवक्ता.आशिष गोंडाने हजर होते.यावेळी तडजोडी अंतर्गत निकाली निघालेल्या पक्षकारांना मा.न्यायाधीश मा.गो.मोरे यांच्या वतीने फळझाडे भेट स्वरूपात देण्यात आली.

या राष्ट्रीय लोक अदालतला यशस्वी करण्यासाठी तालुका विधिज्ञ संघाचे जेष्ठ अधिवक्ता.मनोहरराव उरकुडे, अधिवक्ता.हेमंत उरकुडे, अधिवक्ता.चंद्रकांत निमजे, अधिवक्ता.रविंद्र चौधरी, अधिवक्ता.गणेश राऊत, अधिवक्ता.विजय नाकतोडे, अधिवक्ता.शरयु देविकर तसेच न्यायालयाचे सहाय्यक अधिक्षक बी.यु.कपाटे यांच्यासमवेत न्यायालयीन कर्मचारी संघप्रिया रामटेके,एच.जी.खोब्रागडे,उमेश दहीहांडेकर,साबेर काझी,प्रशांत वालदे,पंकज कोल्हे,अंकुश मावस्कर,आशिष रामटेके,अजय जिभकाटे,नरेश पेंदोर,प्रियंका डोंगरे इत्यादींनी मोलाचे सहकार्य केले.