संजयभाऊ कोळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सांगली जिल्हा ओबीसी उपाध्यक्ष पदी निवड

29

✒️कवठेमहांकाळ (पुरोगामी संदेश नेटवर्क)

कवठेमहांकाळ(दि.13 डिसेंबर )- तालुक्यातील आदिवासी विकास संघ महाराष्ट्र राज्य चे उपाध्यक्ष तथा पुरोगामी संदेश चे विशेष प्रतिनिधी श्री संजय भाऊ कोळी यांची राष्टवादी काँग्रेस पार्टीचे सांगली जिल्हा ओबीसी उपाध्यक्ष पदी निवड करण्यात आली. मतदार संघाचे लोकप्रिय, कर्तव्यदक्ष, आमदार आदरणीय सुमनताई आर आर पाटील व राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष श्री अविनाश काका पाटील यांचे हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले.

यावेळी उपस्थित राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष पै.ताजुद्दीनभैया तांबोळी‌, तासगाव तालुका अध्यक्ष विश्वासतात्या पाटील, ओबीसी नेते रमजानभाई मुल्ला, धनाजी जाधव, पदवीधर तालुका उपाध्यक्ष दादासाहेब नरळे, संपत नरळे उपस्थित होते.यावेळेस यांना आदिवासी विकास संघ महाराष्ट्र राज्याचे संस्थापक श्री मोतीलाल सर सोनवणे व पूर्ण संघटनेने त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.